आदित्य ठाकरें नंतर श्रीकांत शिंदे सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले

आदित्य ठाकरें नंतर श्रीकांत शिंदे सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले

काही दिवसांपासून अनेक नेते शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानाची पहाणी करण्यासाठी जात आहे. आधी शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानाची पाहणी करण्यासाठी गेले होते. तर आज मुख्यमंत्री एकना शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे सिल्लोडमध्ये दाखल होताच त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र काही तासापूर्वीच आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करतांना पावसाळा संपला असून, पंचनामे देखील पूर्ण झाले आहेत. त्यामुळे शेतात काहीच उरलं नसल्याने आदित्य ठाकरे कशाची पाहणी करणार असे सत्तार म्हणाले होते. पण आता श्रीकांत शिंदे देखील पाहणीसाठी आल्याने अब्दुल सत्तार तोंडघशी पडले आहे.

आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करतांना अब्दुल सत्तार म्हणाले होती की, पावसाळा संपला आहे, सोगणी झाली असून, शेतात आता पिकांचे धसकट उरली आहे. त्यामुळे शेतं खाली झाल्यावर आणि कापसाच्या पिकांचे नकट्या राहिल्यावर आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर येत असतील तर धन्य आहे, असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला. तर विरोधकांची आता एक कार्यशाळा घेण्याची गरज असून, विरोध कधी करायचा याबाबत तरी त्यांना यातून कळेल असेही सत्तार म्हणाले होते.

खासदार श्रीकांत शिंदे दुपारी साडेतीन वाजता सिल्लोड येथे हेलिकॉप्टरने दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सिल्लोड येथील घायगाव, अंधारी, फुलंब्री तालुक्यातील आळंद गावातील नुकसानग्रस्त भागात पाहणी केली. त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद देखील केला. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह शिंदे गटाचे नेते देखील उपस्थित होते. तर काही वेळात श्रीकांत शिंदे आपल्या सभेतून भाषण करणार आहे. त्यामुळे ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा :

हिंदू शब्द फारसी आहे… याचा अर्थ अत्यंत घाणेरडा, कर्नाटक काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांचे वादग्रस्त विधान

ट्विटरने कॉपीराइट उल्लंघनाबद्दल काँग्रेस, भारत जोडो यात्रेचे हँडल ब्लॉक करण्यास सांगितले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version