आदित्यनंतर उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ, दिशा सालियन प्रकरणात गुप्तचर विभागाकडून होणार चौकशी

आदित्यनंतर उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ, दिशा सालियन प्रकरणात गुप्तचर विभागाकडून होणार चौकशी

आदित्य ठाकरेंनंतर (Aditya Thackeray) आता उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अमरावती (Amravati) येथील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे (Umesh Kolhe) हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत (SIT) चौकशी करण्याची मागणी आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केली आहे. यानंतर शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल आल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल अशी माहिती विधनसभेत दिली आहे. उद्धव ठाकरेंनी पोलिसांना (police) चोरीच्या बाजूने तपास करा असा आदेश दिला होता आरोपही रवी राणा यांनी केला आहे. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं होतं.

“उमेश कोल्हे प्रकरणाची सविस्तर माहिती रवी राणा यांच्याकडून घेतली जाईल. तेथील पोलीस आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर त्यांचा आक्षेप आहे. राज्य गुप्तचर विभागाकडून (State Intelligence Department) या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल १५ दिवसांच्या आत मागवला जाईल. गृहमंत्री (Home Minister), उपमुख्यमंत्र्यांकडे (Deputy Chief Minister) हा अहवाल सोपवला जाईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल,” असं आश्वासन शंभूराज देसाईंनी दिलं आहे. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश‍ कोल्हे हे दुकान बंद करून मोटरसायकलने घरी जात असताना रात्री १०.३० वाजताच्या सुमारास श्याम चौकातील घंटाघर परिसरात चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून सहा जणांना अटक केली होती.

भाजप नेत्या नुपुर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद (Prophet Mohammad) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मुस्लिम समाज आक्रमक झाला. अनेक ठिकाणी आंदोलनं देखील झाली. याच काळात अमरावतीचे औषध विक्रेते उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. नुपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर (Social media) पोस्ट केल्यानं उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र हे प्रकरण उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक दाबल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांना (Commissioner of Police) देखील फोन केला होता असं राणा यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

भारतात चित्यांची दहशद वाढणार, संसदेत केंद्र सरकारची माहिती

2023 IPL Auction आयपीएलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! २०२३ आयपीएल लिलावाला आज होणार सुरुवात

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version