अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यानंतर ‘मुंबईत काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले’ म्हणत शिवसेनेने लगावला टोला

काल ते जमीन दाखवायची म्हणाले, थोडक्यात काय संघर्षाचा काळ आहे

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यानंतर ‘मुंबईत काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले’ म्हणत शिवसेनेने लगावला टोला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah in Mumbai) हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते. गणपती दर्शनासह अमित शाह यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. एकनाथ शिंदे गट आणि भाजपा एकत्रित लढणार असून, मुंबईत 150 जागा मिळवण्याचे टार्गेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी राज्यातील भाजपा नेत्यांना दिले आहे.शिवसेनेची जी सध्याची स्थिती झाली आहे, ती भाजपामुळे झालेली नसून त्यांनी ती स्वताच्या हाताने ओढवून घेतल्याची टीकाही अमित शाहा यांनी केली आहे.अमित शाह (Amit Shah) यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘मुंबईत काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले, काल गणपतीच्या मंडपात देखील राजकारण दिसलं. गणपती जिथे आहे तिथे काही बोलू नये, पण ते बोलून गेले. गणपती हा बुद्धीचा दाता आहे, त्यांनी सर्वांना सुबुद्धी द्यावी,’ असा टोला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. ‘काल ते जमीन दाखवायची म्हणाले, थोडक्यात काय संघर्षाचा काळ आहे. ते शिवसेना संपवायला निघाले आहेत. निष्ठा ही कितीही बोली लावली तरी विकली जाऊ शकत नाही. पसाराभर नासलेली लोक असल्यापेक्षा मूठभर निष्ठावान असतील तर मैदान जिंकू शकतो. ही काय माझी खासगी मालमत्ता नाही,’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचा आहे, तिथे मी सविस्तर बोलेन. आतापर्यंत मुख्यमंत्रीपदाचा मास्क असायचा, त्यामुले बोलताना जपून बोलावं लागायचं, आता तसं नाहीये, असा टोला उद्धव ठाकरेंनी हाणला. एवढच नव्हे तर अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर शिवसेनेच्या शाखाप्रमुखांची बैठक बोलावली. मुंबईतील सर्व विभागप्रमुख आणि विभाग महिला संघटक या बैठकीला उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंशिवाय शिवसेनेच्या इतर नेत्यांकडून देखील केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यावर सडकुन टीका करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

विमान भाड्यात तब्बल 50 टक्के कपात! जाणून घ्या काय असतील नवे दर

‘ती बाई आम्हाला काय शिकवणार?’ चंद्रकांत खैरेची टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version