बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदेंची धाकधूक वाढली

ठाणे आणि कल्याणच्या जागेची मागणी अद्याप कुणीही केली नाही, या दोन्ही जागा कुणाकडे जाणार हे अद्याप ठरलं नसल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदेंची धाकधूक वाढली

ठाणे आणि कल्याणच्या जागेची मागणी अद्याप कुणीही केली नाही, या दोन्ही जागा कुणाकडे जाणार हे अद्याप ठरलं नसल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. या जागा कुणाकडे जातील हे केंद्रीय समिती ठरवेल असंही ते म्हणाले. बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर आता शिंदे गटाची धाकधुक वाढली आहे. कारण ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे तर कल्याणमधून त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत.

शिंदे गटाचा 22 जागांवर दावा, भाजप 13 जागा सोडण्यास तयार?

दरम्यान शिंदे गटाने लोकसभेच्या 22 जागांवर दावा केला आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत लोकसभेचे 13 खासदार असल्याने या 13 जागा सोडण्यास भाजप तयार आहे. पण उर्वरित जागांचा तिढा कसा सोडवायचा हा प्रश्न आहे. तसेच अजित पवार गटालाही लोकसभेच्या जागा द्याव्या लागणार आहेत.

राज्यातून लोकसभेसाठी महायुतीचे 45 खासदार निवडूण आणून नरेंद्र मोदी यांना ताकद देण्याचं नियोजन भाजपने आखलं आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपन राजकीय डावपेचही टाकायला सुरूवात केली आहे. महायुतीमध्ये आता अजित पवार गटही सामील झाल्यामुळे हे सहज शक्य होईल असा भाजपचा होरा आहे. पण जागावाटप करताना मात्र महायुतीच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.

 

हे ही वाचा : 

क्रिकेटचा समावेश आता ऑलिंपिक मध्येही; टी-२० ला IOC कडून मंजुरी

बनावट लग्नच रॅकेट उद्धवस्त, आरोपी महिला मुलीची आई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Exit mobile version