निवडणुका, जनगणनेनंतर आता शिक्षक करणार चहा वाटप, काँग्रेसकडून केसरकारांवर हल्लाबोल

निवडणुकीच्या काळात किंवा जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची (Teachers) ड्युटी लागणे आता काही नवी गोष्ट राहिलेली नाही.

निवडणुका, जनगणनेनंतर आता शिक्षक करणार चहा वाटप, काँग्रेसकडून केसरकारांवर हल्लाबोल

निवडणुकीच्या काळात किंवा जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची (Teachers) ड्युटी लागणे आता काही नवी गोष्ट राहिलेली नाही. यावरून अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवले आहेत. परंतु कोकणात (Konkan) गणेशोत्सवासाठी (Ganesh Utsav 2022) येणाऱ्या चाकरमान्यांच्याबाबतीत नियोजन करण्यासाठी चक्क प्राथमिक शाळेतील शिक्षकांची ड्युटी एसटी आगारामध्ये (ST Depot) लावण्यात आली आहे. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा प्रशासनाने याबाबत आदेश काढले आहेत. यावरुन आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कारण राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर (State Education Minister Deepak Kesarkar) हे कोकणातले आहेत. त्याच कोकणातील शिक्षकांना चाकरमान्यांचं नियोजन करण्याचं काम दिलं आहे.

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आदेश काढले असून, या आदेशानंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. चहा वाटपाची ही जबाबदारी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना लावण्यात आली असून, काँग्रेसकडून शिक्षण मंत्री दीपक केसरकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “कोकणातील शिक्षकांना गणपतीसाठी गावाकडे येणाऱ्या लोकांसाठी चहापान व्यवस्था करण्याचे आदेश काढणाऱ्या रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध. बरं राज्याचे शिक्षणमंत्री केसरकर हे कोकणातीलच आहेत. शिक्षकांना शिक्षण सोडून इतर कामे द्यायची व शैक्षणिक गुणवत्तेवरून जबाबदारही धरायचं. वा रे!” अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे (Maharashtra Pradesh Youth Congress President Satyajit Tambe) यांनीही ट्वीट (tweet) करत केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या केवळ राजापूर तालुक्यातील ३९ शिक्षकांची ड्युटी राजापूर आगारात लावण्यात आली आहे. दररोज तीन शिक्षक हे किमान आठ आठ तास एसटी आगारात ड्युटी करणार असून, राजापूर तालुक्यात जवळपास ८५० शिक्षकापैकी ३९ शिक्षकांची ड्युटी राजापूर आगारात लावण्यात आली आहे. हा निर्णय प्रांत आणि तहसीलदारांच्या आदेशानुसार घेण्यात आल्याचे राजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. ए. कडू यांनी सांगितले आहे. मात्र, या निर्णयाला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

हे ही वाचा :- 

गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या घरी जाणे औपचारिकता की, मनपासाठी नवीन समीकरण?

डॉन दाऊदची माहिती देणाऱ्याला एनआयए कडून मोठ्या रकमेचं बक्षीस जाहीर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version