घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम केले जात आहे; उदय सामंतांनी केला आरोप

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिसकडून काल रात्री हत्या करण्यात आली.

घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम केले जात आहे; उदय सामंतांनी केला आरोप

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिसकडून काल रात्री हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या हत्यापुर्वी मॉरिस नोरान्हो याने चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माफियागिरी आणि गुंडगिरीला पाठबळ देत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या सर्व घडामोडीवर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. अभिषेक घोसाळकर यांची हत्या गंभीर आणि दुर्दैवी आहे. घोसाळकर यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम केले जात आहे. मात्र, उबाठा गटातील अंतर्गत गँगवॉरमुळे मॉरिस नोरान्हो याने घोसाळकरांची हत्या केली आहे. या दोघांमध्ये मी नगरसेवक होणार की तू नगरसेवक होणार, हा वाद होता. यामधून हा प्रकार घडला आहे, असे वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

‘सामना’तून वेळोवेळी मॉरिस नोरान्होच्या सामाजिक कार्याचा गौरव आणि त्याला पाठिंबा दिला जात होता. मॉरिसच्या कामाला ‘सामना’तून तर घोसाळकर कुटुंबीयांच्या कामाला मातोश्रीवरुन पाठिंबा दिला जात होता. राज्यात कुठलीही घटना घडली की त्यासाठी एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरणे चूक आहे,असे उदय सामंत म्हणाले. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर विनाकारण एकनाथ शिंदे यांना लक्ष केंद्रित केले जात आहे. त्याऐवजी मॉरिस नोरान्हो आणि अभिषेक घोसाळकर यांना आपापसात समझोता करायला लावणारी व्यक्ती कोण,याचा शोध घेतला पाहिजे. या दोघांना फेसबुक लाईव्ह करायला सांगून तुमच्यातील वाद मिटवा, असे कोणी सांगितले होते? घोसाळकर आणि नोरान्हो यांच्यात समझोता झाला होता. मात्र, हे दोघे आमचे कार्यकर्ते नव्हते. या दोघांनी उबाठामध्ये एकत्र काम करुन पक्ष वाढवण्याचा निर्णय घेतला होता. ही गोष्ट पोलिसांनी तपास करताना लक्षात घेतली पाहिजे. फेसबुक लाईव्हपूर्वी या दोघांची कोणाशी चर्चा झाली होती, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी उदय सामंत केली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. ठाकरे गटाकडून वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले जात आहेत. अभिषेक घोसाळकर याची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरान्हो यानेही वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, असा आरोप देखील करण्यात आला आहे. या पार्शवभूमीवर उदय सामंत एकनाथ शिंदे यांची बाजू मांडत आहेत. अभिषेक घोसाळकर यांची हत्या ठाकरे गटातील अंतर्गत वादातूनच घडल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा: 

आयुक्तांनी आदेश देऊनसुद्धा सोशल मीडियावर रिल्स पोस्ट, अजित पवारांनी दिला गुन्हेगारांना इशारा

CM Eknath Shinde Not Out 60, प्रवास वाघाच्या डरकाळीचा आणि गरुडाच्या भरारीचा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version