spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज ठाकरेंच्या भेटीनंतर डाॅ. जयसिंगराव पवारांचा मोठा खुलासा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी आपल्या दोनदिवसीय कोल्हापूर दौऱ्यात ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत चर्चा झाली होती का? अशी विचारणा केल्यानंतर डाॅ. जयसिंगराव पवार (Jaysingrao Pawar ) यांनी भेटीत दोन तीनवेळा उल्लेख झाल्याचे सांगत बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांनी सांगितलेला सगळाच इतिहास खोटा आहे असं कसं म्हणून चालेल? असे म्हणाले होते. दरम्यान, या विधानानंतर विपर्यास केला जात असल्याचे सांगत पवार यांनी निवेदन प्रसिद्ध करत भूमिका स्पष्ट केली आहे.

जयसिंगराव पवार म्हणाले, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यामध्ये माझी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ते माझ्या निवासस्थानी आले. तेव्हा त्यांच्याबरोबर इतिहासातील विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी प्रत्यक्ष इतिहास आणि त्याचा चित्रपटांतून होणारा विपर्यास यावर चर्चा झाली. मी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देऊन आजच्या काळाच्या संदर्भात त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. प्रबोधनकारांचा विचार घेऊन मुख्यमंत्री म्हणून आल्यावर आपण महाराष्ट्रात धडाकेबाज काम कराल आणि त्याचे मी स्वागत करेन, असे मी म्हणालो. माध्यमांमध्ये या विधानाची अतिशयोक्ती झाली. यावेळी त्यांच्याशी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर काहीही चर्चा झाली नाही,” अशी माहिती जयसिंगराव पवार यांनी दिली.

जयसिंगराव पवार पुढे म्हणाले, “राज ठाकरे निघून गेल्यावर पत्रकारांनी मला बाबासाहेब पुरंदरेंबद्दल प्रश्न विचारला. त्यावर मी इतिहासकार म्हणून पुरंदरेंचे गौरवीकरण करणारे वक्तव्य केलेले नाही. कारण मी आतापर्यंत लिखाणातून व संशोधनातून पुरंदरे यांच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टीका केली आहे आणि त्यावर आजही ठाम आहे.’

हे ही वाचा : 

Akshaya Hardeek Wedding सर्वांची लाडकी जोडी, राणादा आणि पाठक बाई अडकले लग्नबंधनात

राज्यपालांविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss