प्रसाद लाड यांच्या आरोपानंतर, सुभाष देसाईंचं भाजप नेत्यांनाच चॅलेंज

प्रसाद लाड यांच्या आरोपानंतर, सुभाष देसाईंचं भाजप नेत्यांनाच चॅलेंज

फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’ही गुजरातला गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे राज्यातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यरोप सुरू आहेत. सुभाष देसाई ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा आदर आम्ही करतो. ते जर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत गेले तर महाराष्ट्रात येणारे प्रकल्प का गेले याची जंत्री मांडू असं प्रसाद लाड म्हणाले. फॉक्सकॉन, टाटा एअरबस, डीआरडीओचे प्रकल्प कोणी थांबवले यांचं उत्तर द्यावं, दुबईत कोण बैठक घेत होते? सुभाष देसाई यांच्या टक्केवारीमुळं प्रकल्प गेल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला होता. प्रसाद लाड यांच्या आरोपावर एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना सुभाष देसाई यांनी खबरदार वाटेल ते आरोप सहन करणार नाही, असा इशारा दिला. जे आरोप करत आहेत त्यांनी पुरावे द्यावेत, असा चॅलेंज देसाई यांनी यावेळी दिले.

माध्यमांशी संवाद साधतांना सुभाष देसाई यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे फडणवीस सरकार स्थापन करण्यामागं देखील महाराष्ट्रातील प्रकल्प पळवताना विरोध व्हायला नको, हे एक कारण असू शकतं. प्रकल्प गेल्या वर्षी गेला आहे तर आज का बातम्या दिल्या जात आहेत. २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आज बातमी का दिली जात आहे. भूमिपूजन दोन दिवसांनी होणार आहे, ही बातमी मविआनं दिली आहे का? जे काय घडलं ते मान्य करा. भाजपच्या आरोपांविषयी विचारलं असता, खबरदार वाटेल ते आरोप सहन करणार नाही. ज्याला कुणाला आरोप करायचे आहेत त्यानं त्याठिकाणी पुरावा द्यावा, काय बालिशपणे बोलत आहेत, असं सुभाष देसाई म्हणाले.

महाविकास आघाडीवर खापर फोडून महाराष्ट्रात गुंतवणूक वाढणार असेल तर रोज खापर फोडा. गुजरातमध्ये तीन महिन्यात तीन प्रकल्प जाणे हा योगायोग आहे का, असा सवाल सुभाष देसाई यांनी केला. हिमाचल प्रदेश आणि गुजरातची निवडणूक जाहीर व्हायची, आता फक्त हिमाचल प्रदेशची निवडणूक जाहीर झाली गुजरातची निवडणूक लांबली हा योगायोग आहे का? असा सवाल सुभाष देसाई यांनी केला.

हे ही वाचा :

Tata Air Bus Project : उदय सामंत महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आहे की गुजरातचे ?, नाना पटोलेंचा सवाल

गुन्हेगार पोलिसांवर भारी, रात्री उशिरा अंधारात का थांबले? विचारणा केल्यास पोलिसांनाच मारहाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version