spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Chitra Wagh : सत्तारांच्या विधानानंतर चित्र वाघ यांनी कंगना रानौतसाठी वापरलेल्या शब्दांचीही करून दिली आठवण

महाराष्ट्राचे कृषिमंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्या तोंडून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना अपशब्द उच्चारला गेला. ५० खोकेंबद्दल होणाऱ्या टीकेबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना जाहीर मुलाखतीत त्यांनी अपशब्दाचा वापर केला. सत्तार यांच्या या शब्दामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्यभरात ‘जोडे मारो’ आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी देखील तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. या दरम्यान भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची बाजू मांडली.

हेही वाचा : 

‘हर हर महादेव’ चित्रपटाला सोलापुरात विरोध?

चित्रा वाघ म्हणाल्या की, महिलांबद्दल अशी वक्तव्य करणं चुकीचं आहे. मुळात पन्नास खोक्यांच्या मुद्द्यावरुन हे भांडण सुरु झालं. तरीही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंगना रणौतवरही खालच्या स्तरावर टीका केली होती. कंगनाला खालच्या शब्दांमध्ये हिणवण्यापर्यंत यांची मजल गेलेली, संजय राऊतांनी कंगना रानौतबद्दल हराम*** असे शब्द असलयाचे आमच्या लक्षात आहे. पण तरीही शिंदे-फडणवीसांच्या सरकारमधील मंत्री, नेते किंवा पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये,” असे स्पष्ट शब्दांत चित्रा वाघ म्हणाल्या.

सत्तारांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदेची पहिली प्रतिक्रिया

अब्दुल सत्तारांनी २४ तासांत माफी मागावी, असा इशारा राष्ट्रवादीने दिला होता. यांना ५० खोक्यांची मस्ती आली आहे, यांची मस्ती उतरवली जाईल, असं राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी म्हटले होते. तसेच, ‘दहा पक्ष बदलणारे सत्तार हे सत्तार आहेत की सुतार आहेत. सत्तेची मस्ती आलीय, ही मस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिरवेल. सत्तारांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून देण्यात आला होता.

राष्ट्रवादीनं सत्तारांचा जाळला पुतळा, ‘अब्दुल सत्तार हा मनुवादाचा कट्टर पुरस्कर्ता’ ; जितेंद्र आव्हाड

Latest Posts

Don't Miss