शहानंतर, मोदींचीही भेट होण्याची शक्यता

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister of the state Eknath Shinde) हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली अश्या चर्चा सुरु आहेत.

शहानंतर, मोदींचीही भेट होण्याची शक्यता

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister of the state Eknath Shinde) हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली अश्या चर्चा सुरु आहेत. आणि आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमवीर पंतप्रधान मोदी यांची भेट होणार का, झालीच तर भेटीत काय चर्चा करणार याची उत्सुकता लागली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित दौऱ्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे काल रात्रीच मुंबईला येणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी स्वतःहून हा मुक्काम एक दिवसाने वाढवला आहे, त्यामुळे चर्चा मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. मुख्यमंत्र्यांनी हा मुक्काम अचानक का वाढवला? त्यामागे पंतप्रधान मोदी यांना भेटण्याचं कारण तर नाही ना? जर मुख्यमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना थेट भेटणार असतील त्यांना आता देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही का? असाही प्रश्न निर्माण होत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा राजधानी दिल्लीतील मुक्काम एका दिवसाने वाढला आहे. एकनाथ शिंदे यांनी काल दि. २१ सप्टेंबरच्या रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यानंतर आज एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमवीर पंतप्रधान मोदी यांची भेट होणार का, झालीच तर भेटीत काय चर्चा करणार याची उत्सुकता लागली आहे. याशिवाय राज्यातल्या राजकारणावर दिल्लीत खलबतं होणं स्वाभाविक आहे.

 

हे ही वाचा:

शिवसेनेला आणखी एक धक्का; मुंबई पालिकेनं दोन्ही गटांची परवानगी…

Shivsena Dasara Melava : आज हायकोर्टात शिंदे-ठाकरे सुनावणी, शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version