spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शाईफेकनंतर चंद्रकांत पाटलांनी दिली पहिली पतिक्रिया

आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांवर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या कार्यालयाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने घोषणाबाजी केली होती. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर त्यांनी प्रचंड आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. “अरे हिंमत असेल तर समोर या. चला सर्व पोलीस डिपार्टमेंटला बाजूला करु”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलंय. पण या घटनेवर भाजप नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी चळवळीतला माणूस आहे. आपण कुणालाही घाबरत नाही. मी दिलगीरी व्यक्त केल्यानंतरही हा हल्ला झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमाला धक्का लावत आहे. विरोध लोकशाही मार्गाने करायचा. सध्या झुंडशाही चालू आहे. ही झुंडशाही चालणार नाही. शब्दाला शब्दाने टक्कर द्यायला हवी, असही ते म्हणाले. पाटील पुढं म्हणाले की, गिरणी कामगाराचा पोरगा या स्टेजपर्यंत आला हे झेपत नसल्याने सरंजामशाहीकडून हल्ले होत आहे. हे चुकीचे पायंडे पडले आहेत. या प्रकरणात पोलिसांना दोष देण्याच कारण नाही. कार्यकर्ते आले आहेत. पोलिसांना कस कळेल की, कोणता कार्यकर्ता आहे आणि कोण बदमाश आहे.

दरम्यान ही लोकशाही नाही, झुंडशाही आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांचा (Babasaheb Ambedkar) अपमान आहे. मी पैठणला बोललो त्याचा विपर्यास झाला. छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर १०० मार्कांचा अभ्यासक्रम सुरु करायला हवा, असंही पैठणच्या कार्यक्रमात म्हणालो होतो. मात्र मीडियाने हे दाखवलं नाही, याची खंतही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा : 

सीमावादावर सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाईफेक

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss