Sharad Pawar यांच्या पाठोपाठ आता मिळणार Mohan Bhagwat यांनाही Z+ सुरक्षा

Sharad Pawar यांच्या पाठोपाठ आता मिळणार Mohan Bhagwat यांनाही Z+ सुरक्षा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडत आहे. काही जेष्ठ राजकारण्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (RSS Mohan Bhagwat) यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. भागवतांना पंतप्रधान मोदीं इतकी सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र अचानक सुरक्षेत वाढ का करण्यात येत आहे, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोहन भागवतांना आधी झेड प्लस सुरक्षा होती, त्यात वाढ करून Advance Security Liaison (ASL) पर्यंत करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांनाही इतकीच सुरक्षा दिली जात आहे.

मोहन भागवत यांना अशी झेड प्लस सुरक्षा का ?

भागवतांची सुरक्षा का वाढविण्यात आली, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यांना पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांइतकी सुरक्षा देण्यात आली? त्यांना कोणाची भीती आहे? भागवतांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही वाढ करण्यात आली आहे. कथितपणे भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांचे राज्य असलेल्या राज्यांमध्ये भागवतांच्या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत काही कमतरता आढळली होती. ज्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. भागवत हे अनेक कट्टरपंथी मुस्लीम संघटनांसह अनेक संघटनेंच्या निशाण्यावर असल्याचं सांगितलं जात आहे.

ASL सुरक्षा म्हणजे काय ?

ASL अंतर्गत संरक्षण देणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेशी संबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य आणि या स्तरावरील इतर विभागांचा सहभाग अनिवार्य आहे. यात बहुस्तरीय सुरक्षा घेरासह तोडफोडविरोधी तपासाचा समावेश आहे. हेलिकॉप्टर प्रवासाला केवळ खास डिझाइन केलेल्या हेलिकॉप्टरमध्ये परवानगी दिली जाईल आणि ते ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार चालतील.

शरद पवारांना Z + दर्जाची सुरक्षा :

मोहन भागवत यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याआधी केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. केंद्र सरकारने शरद पवारांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याची घोषणा केली होती. शरद पवारांना झेड प्लस दर्जाची केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची VIP सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या नेतृत्वातील एनसीपीने ८ जागा जिंकल्या होत्या.

हे ही वाचा:

पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे ; Raj Thackeray यांचा मालवण घटनेवर प्रक्षोभ Dahihandi 2024 special : गोपाळकालाची पूर्वसंद्या होणार सुरमई ; गोविंद रे गोपाळा..नाद रंगणार पुणे-नवी मुंबईत

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version