spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shivsena – NCP पाठोपाठ आता काँग्रेसमध्ये महाभूकंप होणार? ‘हा’ नेता भाजपच्या वाटेवर?

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये मोठा भूकंप झाला तर आता त्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये देखील महाभूकंप होणार असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठ्या उलथापालथी या होत आहेत. दीड वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात अभूतपूर्व बंड झाला आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनमधून काढता पाय घेतला. तर नंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून काढता पाय घेतला. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये मोठा भूकंप झाला तर आता त्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये देखील महाभूकंप होणार असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नुकत्याच चार राज्यांचे निकाल जाहीर झाले आहे आणि या नंतर भाजपचा प्रचंड आत्मविश्वास आता वाढला आहे. त्यामुळे भाजपने आता लोकसभेची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपने जिल्ह्याजिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. भाजपला निवडणुकीत मिळणारं यश कायम असल्याने भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल एक महत्वाचे विधान केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपामध्ये येण्यास इच्छुक असे वक्तव्य त्यांनी केले. यावर आता नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांची प्रतिक्रिया ही दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काल १०० वॉरियर्सच्या बैठकीला आले होते. यावेळी बावनकुळे यांनी महत्त्वाची विधाने केली. भाजपचा दुपट्टा टाकण्यासाठी अनेक लोकं लाईनला आहेत. त्यांनी काही काँग्रेस नेत्यांचा उल्लेख केला. ही बाब जुनी आहे. अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याची दीडशे कोटी रुपयांचे थकहमी मागच्या सरकारने माफ केली नाही. पण भाजपाच्या नेत्यांकडे जेव्हा चव्हाण गेले तेव्हा महायुती सरकारने थकहमी दिली. यावरून लक्षात घेतले पाहिजे. अशोक चव्हाण सत्तेसाठी येऊ शकतात. त्यांच्यासाठी हे काही नवीन नाही. आम्ही त्यांचे भाजपात स्वागत करू, असं चिखलीकर म्हणाले. दरम्यान, चिखलीकर यांच्या या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केलं आहे.आम्ही कुणाकडे जात नाही, पक्ष फोडायला जात नाही. पण कुणी भाजपचा दुपट्टा घालणार असेल तर त्यांचं स्वागतच आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss