spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

फडणवीसांबद्दल बोलल्यानंतर एसआयटी चौकशी केली जाते; आमदार रोहित पवारांची टीका

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटी मधील उपोषणादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटी मधील उपोषणादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यावर आमदार रोहित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी भाजप नेते मनोज जरांगे यांच्यावर तुटून पडले आहेत, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

दोन दिवसांआधी भाजपचं बैठक पार पडली होती. त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस प्रचंड रागावलेले होते. त्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी भाजप नेते मनोज जरांगे यांच्यावर तुटून पडले आहेत. त्यामुळे दुसऱ्या कोणालातरी टार्गेट केले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलल्यानंतर त्यांची एसआयटी चौकशी केली जाते. पेपरफुटी ज्यांनी केली त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही, कारण देवेंद्र फडणवीस यांचा यामागे हात आहे, असे रोहित पवार म्हणाले. अधिवेशनात मी माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीचा मुद्दा मांडला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच बैठक झाली. असे सतत होताना आम्ही पहिले आहे. यांना फक्त राजकारण करायचे आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला बैठकीला बोलावले नाही, असे म्हणत रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे.

गुजरातमध्ये १ लाख २० हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले. त्यानंतर महिन्याभराच्या अंतरात २ हजार कोटी रुपयाचे अमली पदार्थ सापडले. हे सर्व गंभीर आहे. राजकीय षडयंत्र भाजपकडून केले जात आहे. भाजपच्या नेत्यानं विरोधात बोलल्यानंतर एसआयटी चौकशी लागू होते. संपूर्ण देशात किंवा महाराष्ट्रामध्ये भाजपाची सत्ता येईल असे वाटतं नाही. आरक्षणाचा मुद्दा, धनगर आरक्षण मुद्दा संसदेत बोलला जाऊ शकतो. मात्र, तिथे कोणी काही बोलत नाही. सध्या लोक त्यांच्या बाजूने नसल्याने भाजप चिंतेत आहे, असे रोहित पवार म्हणाले. अजित पावर यांना चार पाच जागा मिळाल्या असतील. शिरूर लोकसभा मतदारसंघ नसेल, कारण तो शिवसेनेला जाणार आहे. अजित पवार हे दिलीप वळसे पाटील यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मागणी करत होते. मात्र दिलीप वळसे पाटील कोणाचं ऐकत नाहीत, असे रोहित पवार म्हणाले.

हे ही वाचा:

रविंद्र वायकरांवर पक्ष सोडायला कोणी दबाव आणला? सेनानेत्याचा Political Encounter! Ravindra Waikar

मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली, निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss