ठाकरेंच्या दसरा मेळाव्यानंतर दादरमध्ये भाजपचे बॅनर्स फाडले

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) या दोन्ही नेत्यांचा दसरा मेळावा काल अखेर पार पडला. शिवतीर्थ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तर बीकेसी येथे एकनाथ शिंदे यांचा मेळावा पार पडला.

ठाकरेंच्या दसरा मेळाव्यानंतर दादरमध्ये भाजपचे बॅनर्स फाडले

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) या दोन्ही नेत्यांचा दसरा मेळावा काल अखेर पार पडला. शिवतीर्थ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तर बीकेसी येथे एकनाथ शिंदे यांचा मेळावा पार पडला. या दोन्ही मेळाव्याला मैदानांमध्ये तुडुंब गर्दी झाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणात भाजप (BJP) आणि शिंदे गटावर (Shinde Group) बोचरी टीका केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर दिलं. अशातच दोन्ही दसरा मेळाव्यांना (Dasara Melava 2022) अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. दोन्ही मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai News) कडेकोट बंदोबस्त तैनात होता. तरिही शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) ठाकरेंच्या शिवसेना दसरा मेळाव्यानंतर मात्र दादर (Dadar) परिसरात भाजपचे पोस्टर्स (BJP Posters) फाडण्यात आले. याप्रकरणी पोलीस सध्या चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे पोस्टर्स फाडण्यात आले आहेत. शिवाजी पार्कपासून अवघ्या १ ते २ किलोमीटर अंतरावर हे पोस्टर्स फाडण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे समर्थकांनी हे पोस्टर्स फाडले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबईत दादरमध्ये काल ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर या भागात भाजपचे पोस्टर्स फाडण्यात आले. शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा संपल्यानंतर पोस्टर फाडण्याची घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांचे पोस्टर फाडण्यात आले आहेत. पोस्टर्स कुणी फाडले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या प्रकरणात चौकशी करत आहेत. ज्या ठिकाणी ठाकरेंचा शिवसेनेचा दसरा मेळावा झाला, त्या शिवाजी पार्कपासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर भाजपचे पोस्टर्स फाडण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

आनंद दिघेंवरुन एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर धक्कादायक आरोप

भास्कर जाधवांची शिंदेगटावर टीका बीकेसीतला मेळावा कचरा मेळावा आहे…

Eknath Shinde Live : ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची, ही फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version