spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर छगन भुजबळांनी केली सारवासारव

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP leader) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळं सध्या ते चर्चेत आहेत. शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजेत, त्याऐवजी शाळेत सरस्वती (Saraswati) आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP leader) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळं सध्या ते चर्चेत आहेत. शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजेत, त्याऐवजी शाळेत सरस्वती (Saraswati) आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. भुजबळांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला होता. या विधानानंतर आज भुजबळांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, सरस्वतीचा फोटो काढण्यासंदर्भात बोललो नाही तर सरस्वती ऐवजी थोर महापुरुषांना पुजले पाहिजे, हे म्हणालो. आपण शाळेत सरस्वतीची पूजा वगैरे करतो, मग आपल्याला ज्यांनी प्रत्यक्षात शिकवलं. असे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाईं, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, फातिमा बी शेख यांचे फोटोंना का पुजले जात नाही? असा सवाल यावेळी भुजबळांनी केला आहे. ते पुढे म्हणाले या महापुरुषांनी समाजासाठी खस्ता खाल्ल्या. शिक्षणाची दारे खुली केली. ते शिक्षण आपल्याला ते देत असताना यांना प्रचंड प्रमाणामध्ये विरोध सहन करावा लागला, दगड, धोंडे, शेणाचा मारा या लोकांनी खाल्ला. मग शिक्षणासाठी झटणाऱ्या थोर पुरुषांची पूजा का नाही? फुले शाहूंनी प्रत्यक्ष आम्हाला शिकवलं, त्यांनी आपल्याला शिक्षण देण्याचा कार्यक्रम केला. त्यांची आपण पूजा का करत नाही. पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा सावित्रीबाई फुले यांनी सुरु केल्यानांत फक्त सहा मुली होत्या. मग ज्याने आपल्याला शिक्षण दिलं, हा माझा म्हणण्याचा मुद्दा होता, मात्र हा राजकीय विषय बनवला जातो, अशी भूमिका यावेळी भुजबळांनी व्यक्त केली. मी देखील हिंदू आहे, मी खंडोबा, भवानी माता, सप्तशृंगी आदींचे ठिकाणी दर्शनाला जातो. घटस्थापना, इतर सण उत्सव करतो. नाशिकमधील अनेक मंदिराचे काम केले आहे. सप्तशृंगीचे फर्नाक्युलर ट्रॉली केली, त्र्यंबकेश्वरचा रस्ता केला, अनेक ठिकाणी मंदिरे उभारली आहे. त्यामुळे सरस्वती विषयाचं राजकारण करणे चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख, फुले शाहू आंबेडकर हे आमचे देव हेच आहेत, यांची पूजा व्हायला हवी. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये फुले शाहू आंबेडकरांची शिकवण असल्याचे भुजबळ म्हणाले.

काय म्हणाले होते छगन भुजबळ –

सोमवारी छगन भुजबळ यांनी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आयोजित महोत्सवात उपस्थितांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजे, त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात? असा सवाल भुजबळांनी केला होता. देशात अंधश्रद्धा वाढीला लागण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी छगन भुजबळांनी केला. अंधश्रद्धा आणि आमच्या महिला-भगिनींबाबत काही विचारायला नको किंवा काही सांगायला नको. शाळांमध्ये सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. पण सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेबांचा फोटो लावा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फोटो लावा. कारण सरस्वतीचा, शारदा यांना आम्ही काही पाहिलं नाही. त्यांनी आम्हाला काही शिकवलं नाही. त्यांनी तीन टक्के लोकांना शिकवले. आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची, असं भुजबळ म्हणाले होते.

हे ही वाचा:

WhatsApp : व्हाट्सअँप लवकरच आणणार नवीन फिचर

Dasara Melava : CM शिंदेंच्या दसरा मेळाव्याचं पोस्टर आले समोर, आम्ही विचारांचे वारसदार…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss