spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Jitendra Awhad : तक्रारदार महिलेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अन सारी चक्रं फिरली; जितेंद्र आव्हाडांचा दावा

राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही.

राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. दोन दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आल्यानंतर आता पुन्हा एकदा आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे आव्हाड यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पोलिसांनी ७२ तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या ट्वीटमधून जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

हर हर महादेव सिनेमावरुन विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तर काल कळवा-मुंब्रा नवीन पुल उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान महिलेनं विनयभंगाचा आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलंय.

  हेही वाचा : 

Jitendra Awhad : आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ७२ तासात दुसरा गुन्हा दाखल

तक्रार दाखल केलेल्या महिलेने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली आहे. जे माझ्यासोबत झालंय ते दुसऱ्या महिलेसोबत होऊ नये. हे काय आहे, मध्ये येता म्हणून बाजूला उचलून फेकून देता. जितेंद्र आव्हाड यांनी माझ्याकडे वाट मागायला पाहिजे होती किंवा दुसऱ्या वाटेने जायला हवे होते. पण आपल्या हातात ताकद आहे, त्याचा वापर करू, ही जितेंद्र आव्हाड यांची मानसिकता आहे. त्यांनी माझ्यासोबत केलंय ते खूप चुकीचं आहे. मी या प्रकाराचा निषेध करते, असे संबंधित महिलेने सांगितले.

संबंधित महिलेने त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर वेगाने चक्रं फिरली आणि माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यामुळे यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय स्पष्टीकरण देणार, हे पाहावे लागेल.

गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आज सकाळपासूनच ठाण्यात तणाव निर्माण झाला असून आव्हाड यांच्या विवियाना मॉलजवळच्या घरासमोर काही ठिकाणी रस्त्यावर जळलेले टायर टाकून वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न झाला.

मोठी बातमी! राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय

आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केलं आहे. पोलिसांनी ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केलं आहे. हर हर महादेव सिनेमावरुन विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तर काल कळवा-मुंब्रा नवीन पुल उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान महिलेनं विनयभंगाचा आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलंय.

भारत जोडो यात्रेत काँग्रेसबरोबर जनताही रस्त्यावर उतरल्याने भाजपाचा जळफळाट ; नाना पटोले

Latest Posts

Don't Miss