विधानपरिषदेत झालेल्या गोंधळानंतर सुषमा अंधारेंनी केला मोठा दावा, शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना अडचणीत आणणं हे फडणवीसांचं षडयंत्र

विधान परिषदेत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर विधान परिषदेत प्रचंड गोंधळ झाला.

विधानपरिषदेत झालेल्या गोंधळानंतर सुषमा अंधारेंनी केला मोठा दावा, शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना अडचणीत आणणं हे फडणवीसांचं षडयंत्र

विधान परिषदेत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर विधान परिषदेत प्रचंड गोंधळ झाला. या गोंधळामुळे सभागृहाच्या सभापतींना अधिवेशन तहकूब करावं लागलं. या गदारोळानंतर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा उल्लेख करत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना अडचणीत आणणं हे देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र असल्याचा धक्कादायक दावा सुषमा अंधारे यांनी केला.

“देवेंद्र फडणवीस फार अभ्यासू नेते आहेत. त्यांच्याकडून मला फार अभ्यासू उत्तराची अपेक्षा आहे. स्वातंत्र्यवीर सावकरकरांची एक स्लाईड मी सांगोल्याच्या सभेत सांगितली होती. आता त्याला जोडून आणखी एक सांगते.” “मी फुले, शाहू, आंबेडकर, कबीर अशा विचारधारेतून आलेली मुलगी आहे. माझ्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांना आपेक्ष असतील तर माझी जडणघडण ज्या विचारधारेतून झाली, मी पोस्टमन आहे, मुळ विचार फुले, शाहू, आंबेडकर या सगळ्या ग्रंथ संपदेमध्ये आहे.” असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

तसेच पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, “देवेंद्रजींना खरंच आक्षेप असतील तर ते स्वातंत्र्यवीर सावकर, प्रबोधनकार ठाकरे, ज्योतिबा फुले यांनी लिहिलेली पुस्तकं हे सगळं साहित्य खोटं आहे असं देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणतील का? “त्यांनी या पुस्तकांबद्दलची आपली वैचारिकता एकदा सभागृहात सादर करावी. बाकी मला धर्माचं शस्त्र घेऊन मारायाचं, तोडायचं, फाडायचं आणि कापायचं आहे ते करायला हरकत नाही. कारण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपच्या टीमला गेल्या तेरा वर्षात माझ्या भाषणातील १४ सेंकदाचा चंक सापडला नाही. मी शिवसेनेतून आता प्रश्न विचारते ही त्यांची अडचण आहे.”

“मूळ चर्चा काय आहे? तर ८३ कोटींचा भूखंड दोन कोटीला कसा विकला गेला? हा प्रश्न भाजपच्या आमदारांनी का तारांकीत म्हणून नोंदवला? आज सभागृहात तब्बल चार मंत्र्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली. त्यामुळे तब्बल चार मंत्री अडचणीत आले आहेत. हे चारही मंत्री शिंदे गटातील आहे. म्हणजे टीम भाजप पद्धतशीरपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटाचे मंत्र्यांनाही अडचणीत आणत आहे”, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

“भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दहा-पंधरा दिवसांपूर्वी म्हणाले होते की आम्हाला फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून बसवायचं आहे. ते पद्धतशीरपणे कारस्थान पुन्हा एकदा पूर्णत्वास नेलं जात आहे. इकडे चर्चेची राळ उडवाची आणि तिकडे षडयंत्र आखायचं ही देवेंद्र फडणवीस यांची नीती कौतुकास्पद आहे”, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

विधान परिषदेत काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘सुषमा अंधारे म्हणतात की, राम आणि कृष्ण थोतांड आहेत. सीतामातेला जो सोडून जातो आणि स्वत: शबरीसोबत बोरं खात बसतो. कुछ हुवा तो क्या हमने तुमको देखा, तुमने हमको देखा हे बोललं जातं.’ ‘कृष्ण बायकांना अंघोळ करताना पाहतो. कृष्ण पुन्हा अवतरत नाही. तो कुठल्यातरी गोपिकेसोबत डेटवर गेला असावा असं तुमचं नेते म्हणतात त्यावर तुम्ही काही बोलत नाहीत. त्यावर तुम्ही मुक गिळून बसतात.’ ‘या देशातील लोकं इतके मेरिटवाले होते की, माकडं पूल बांधत होती. अशा आमच्या रामाबद्दल बोललं जातं. तेव्हा अपमान होत नाही.’ ‘शंभूराजेंबद्दल ज्या पुस्तकारत आक्षेपार्ह लिहिलं आहे. ते पुस्तक वाचून सुप्रिया सुळे इंटरेस्टिंग असं बोलतात.’ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल लालू प्रसाद यादव काय म्हणाले होते.पण तुम्ही त्यांच्याच मुलाला भेटायला गेले होते. परब साहेब तुम्ही कधीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं उदाहरण नाही दिलं. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकारांना माफीवीर म्हणाले. त्यांच्या गळ्यात गळे घालून तुम्ही फिरतायंत.

 

हे ही वाचा:

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, विराट कोहलीचे BCCIला पत्र T20 मधून ब्रेक घेणार असल्याची दिली माहिती

मला धक्काच बसला आणि आश्चर्यही वाटले, IPL लिलावात विकला न गेल्याने ‘या’ वेगवान गोलंदाजाने व्यक्त केले आश्चर्य

Anil Deshmukh यांना कोर्टाचा मोठा दिलासा ! । NCP

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version