शिवसेना व शिंदे गटातील वादानंतर आज दादर पोलीस स्टेशनबाहेर राडा

गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना हे वाद सुरु आहेत. पण आता हे वाद हळू हळू वाढू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री मुंबईतील प्रभादेवीत गणेश विसर्जनादरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादावादी नंतर काल पुन्हा एकदा मोठा वाद झाला आहे. या दोन्ही गटात जोरदार हाणामारी देखील झाली.

शिवसेना व शिंदे गटातील वादानंतर आज दादर पोलीस स्टेशनबाहेर राडा

गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना हे वाद सुरु आहेत. पण आता हे वाद हळू हळू वाढू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री मुंबईतील प्रभादेवीत गणेश विसर्जनादरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादावादी नंतर काल पुन्हा एकदा मोठा वाद झाला आहे. या दोन्ही गटात जोरदार हाणामारी देखील झाली. दरम्यान आता हा वाद विकोपाला गेला आहे. शिवसेनेतील कार्यकर्त्यांना अटक झाल्या नंतर आज दादर पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. सदा सरवणकर यांच्या विरोधात त्याठिकाणी घोषणा बाजी करण्यात आली.

हे ही वाचा :- प्रभादेवीत मध्यरात्री शिवसेना-शिंदे गटात जोरदार वाद, सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप

या सर्व वादानंतर आज दादर पोलीस स्टेशनमध्ये अरविंद सावंत यांनी उपस्थिती दर्शवली तसेच किशोरी पेढणेकर आणि अनिल परब देखील दादर पोलीस स्टेशन मध्ये पोहचले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवसेना आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. शिवसैनिकांना अटक करण्यात आली, याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत रविवारी दादर पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी त्यांनी पोलिसांशी चर्चा करुन प्रतिक्रिया देईन, असे सांगितले. मात्र, हे संपूर्ण प्रकरण ज्या वाटेने जात आहे त्यावरून हा सगळा वाद आणखीन तापण्याची चिन्हे हि दिसून येत होती. आणि आता हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

 

हे ही वाचा:

आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात आज औरंगाबादमध्ये शिक्षकांचा भव्य मोर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version