spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सत्तासंघर्ष सुरु असताना मुख्यंमत्री व सरन्यायाधीश लळीत यांच्या भेटीनंतर, विरोधकांच्या भुवया उंचावल्या

मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्कार सोहळा हा काल पार पडला. या कार्यक्रमानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होऊ लागली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्कार सोहळा हा काल पार पडला. या कार्यक्रमानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सरकारच्या अस्तित्वाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना त्यांनी सरन्यायाधीशांसोबत एका मंचावर दिसणं अनेकांना रुचलेलं नाही.

मुंबईतल्या ताज पॅलेसमध्ये काल सरन्यायाधीशांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजीजू, सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी सरन्यायाधीश लळीत यांच्या सत्कार कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हजर होते. ते मंचावर उपस्थित होते. यावरुन आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली जात आहे.

 काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही मुख्यमंत्र्यांवर अशीच टीका केली आहे. शिंदे फडणवीस सरकारची वैधता आणि कायदेशीरपणा स्वतः सर्वोच्च न्यायालयाद्वारे तपासले जात असताना आणि केवळ सध्याचे राज्य सरकारच नाही तर त्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला देखील अपात्र ठरवले जाऊ शकते, तेव्हा व्यासपीठ असं विसंगत दिसतं. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी ट्वीट करत याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. आपल्या ट्वीटमध्ये जयंत पाटील म्हणतात, सर्वोच्य न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरु आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्य न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे, हे संकेतांना धरून नाही.

Latest Posts

Don't Miss