Saturday, September 28, 2024

Latest Posts

सिनेट निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे गटाने विरोधकांना डिवचलं, बाप को हात लगानेसे पहले…

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकांचे सर्व जागांचे निकाल लागले असून १० पैकी १० जागा जिंकत ठाकरेंच्या युवा सेनेने दणदणीत विजय संपादन केला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकांचे सर्व जागांचे निकाल लागले असून १० पैकी १० जागा जिंकत ठाकरेंच्या युवा सेनेने दणदणीत विजय संपादन केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने सिनेट निवडणुकीत क्लीन स्वीप करून पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं दाखवून दिलं. या दहाही जागांवर ठाकरेंच्या युवा सेनेने दणदणीत आणि खणखणीत विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला अत्यंत प्रतिष्ठेच्या विद्यापीठाच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत उत्साह संचारला आहे. युवासेनेच्या उमेदेवारांनी अभाविपला व्हाईट वॉश दिला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या विजयानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि युवासेनेने आनंदोत्सव साजरा केला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. पहिल्या निकालापासूनच ठाकरेंची युवा सेना आघाडीवर होती. दहाव्या जागेचा निकाल रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी आला. युवा सेनेने १० पैकी ९ जागा जिंकल्यानंतर दहावी जागा तरी आपल्या वाट्याला येते का? याकडे विरोधकांचं लक्ष होतं. पण व्यवस्थित नियोजन, विश्वासहार्यता आणि केलेल्या कामाची पोचपावती म्हणून पदवीधर मतदारांनी युवासेनेच्या बाजूनेच दहाव्या जागेचाही कौल दिला आणि विरोधकांचा सुपडा साफ झाला. यावरूनच आता ठाकरे गटाने मात्र विरोधकांना चांगलेच डिवचले आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ या सोशल मिडिया साईटवरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत या विजयाबद्दल आभारा मानले आहेत. तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही पोस्ट शेअर करत विरोधकांना डिवचलंय. ‘अगोदर पोराशी निपटा.. बापाचा विषय तुमच्या बसचा नाही! ‘असे म्हणत या नेत्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

आदित्य ठाकरे यांनी मानले आभार

सिनेट निवडणुकीतील विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘ पुन्हा एकदा 10 पैकी 10 जागा. ज्यांनी ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांना आणि शिवसेना आणि युवा सेनेच्या माझ्या सहकाऱ्यांना, सर्वांना खूप धन्यवाद. तुम्ही दाखवलेला विश्वास, पाठिंबा, घेतलेली मेहनत आणि आशीर्वाद याबद्दल आभारी आहे. आम्ही फक्त विजयाची पुनरावृत्ती केली नाही तर आमचा परफॉर्मनस्ही लक्षणीयरित्या सुधारला. इथूनच विजयाची सुरूवात होत्ये! ‘ असे लिहीत आदित्य ठाकरेंनी सर्वांचे आभार मानले.

 काय म्हणाले अंबादास दानवे ?

सिनेट निवडणुकीच्या निकालानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही ट्विट केलं आहे. ‘ अब्दालीच्या फौजदारांनो, वाघाचे पट्टे अंगावर पेंट करून हिंडणाऱ्या लांडग्यानो.. अगोदर पोराशी निपटा.. बापाचा विषय तुमच्या बसचा नाही! आता करत बसा.. ‘नरेटिव्ह.. नरेटिव्ह..’ अशी खरमरीत टीका दानवे यांनी केली.

 

हे ही वाचा:

CM Eknath Shinde मुंबई खड्डेमुक्त करणार होते, एवढ्या गंभीर परिस्थितीत ते कुठे होते? Aaditya Thackeray यांचा सवाल

एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी आज सहाव्यांदा येणार होते सुप्रिया सुळे यांनी करून दिली आठवण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss