spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वंचित नंतर आता Vasant More यांच्या हाती पुन्हा शिवसेनेची धगधगती मशाल

राजकीय नाट्यात नवे नवे बदल घडत आहे. काही नवनवीन घडामोडी जनतेच्या निद्रशनास येत आहेत. आता पर्यंत चाललेल्या राजकीय नट्यात आता आले आहे नवे वळण. हे वळण आता कोणत्या रस्त्यावर घेऊन जाते ते पाहावे लागणार आहे. हाती आलेल्या बातमी नुसार वसंत मोरे आता तिसऱ्यांदा आपला रास्ता बदलणार आहेत अशी चर्चा राजकीय विश्वात घडत आहेत. एकंदरीत राजकीय वर्तुळात युद्धात आणि प्रेमात सर्वकाही क्षम्यच असते. असे वातावरण राजकारणात निर्माण झालेले पाहायला मिळत आहे. वसंत मोरे हे विशेष चर्चेत राहिलेले आहेत.

बऱ्याचदा एकाच पक्षात असूनसुद्धा त्यांनी मनसे किंवा आतील नेतेमंडळी यांचा जाहीर निषेद केला आहे.  सुरुवातीला त्यांनी मनसे मधून काही निवडणूक लढवल्या त्यांनतर त्यांनी बहुजन विकास आघाडी चे बोट पकडत पुढील निवडणूक लढवली होती. त्यांनतर काही कालांनंतर त्यांनी पुन्हा मनसेमध्ये यू टर्न मारला होता. या सर्व दरम्यान मनसेचा एक उपक्रम होता ज्यात मनसेने मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न मांडला होता त्यावेळी मोरे यांनी त्याचा जाहीर निषेद नोंदवला होता. त्यांनतर त्यांची पुणे मनसे शहर अध्यक्ष पदावरून तातडीने उचल बांगडी झाली होती. त्यांनतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते की ते लवकरात लवकरच मनसेला शाल श्रीफळ देतील.

आज गाड्यांचा मोठा ताफा, हातात भगवे झेंडे घेत वसंत मोरे यांनी मुंबई गाठली. पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आणि मनसेतून त्यांच्यासोबत शिवसेनेता आलेल्या पदाधिकाऱ्यांसमवेत मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. यावेळी, बऱ्याच दिवसांनी पाऊस आला, आणि पावसासोबत वसंतही आला, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वसंत मोरेंचे स्वागत केले. तर, उद्धव ठाकरेंनीही वसंत मोरेंचे पक्षात स्वागत करताना, तुम्ही सर्वजण जुने शिवसैनिक आहात, तुमचा पक्षात प्रवेश नसून स्वगृही परतत आहात. मात्र, तुम्हाला शिवसेना सोडल्याची शिक्षा द्यायला हवी, असे म्हणत आता पुण्यात (Pune) शिवसेना आणखी वाढवा, हीच जबाबदारी मी देत असल्याचे म्हटले.

मातोश्रीवर आज उद्धव ठाकरेंच्याहस्ते वसंत मोरेंसह त्यांच्या समर्थकांनी शिवबंधन बांधले. यावेळी, शिवसेना नेते संजय राऊत, आमदार सचिन अहीर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी, भाषण करताना वसंत मोरेंनी आता पुन्हा शिवसेनेत परत आलो असून हा पक्षप्रवेश नसून आपल्याच पक्षात घरवापसी करत असल्याचे म्हटले.

उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात बोलताना वसंत मोरेंना चिमटा काढला. शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर काय मान-सन्मान मिळतो, कसा अपमान केला जातो, असे म्हणत मनसेकडून देण्यात आलेल्या वागणुकीवरुन अप्रत्यक्षपणे टोला लगावला. ”शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर मिळालयाच हवी, ती वसंत मोरेंनाही मिळायला पाहिजे. मी वसंत मोरेंसह तुम्हालाही शिक्षा देतोय. मला पूर्वीपेक्षा कित्येक पटीने जास्त पुण्यात शिवसेना वाढवून पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना पुण्यात शिवसेना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीतून महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाची ती लढाई होती. आता, गद्दारी, धोकेबाजी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई होणार आहे. पुणे हे उद्याच्या सत्ताबदलाचं केंद्र असणार आहे, सत्ताबदलाचा जो पाया आहे, खडकवासल्यातून आणलं म्हटल्यावर खडक आहे. मी बरेच दिवसात पुण्यात आलो नाही, आता येईन तो शिवसैनिकांसाठी येईन. तेव्हा आपले सर्व शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांना बोलवा, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना केलं. पुण्यात एकेकाळी शिवसेनेचे ५ आमदार होते, तो काळ मला पुन्हा आणायचा आहे. पुणे हे पुन्हा मला भगवंमय करायचं आहे. त्यासाठी, मी तुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंसह मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकांकडे पुण्यात शिवसेना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे.

गद्दार लोकांच्या सेनेमुळे अशा घटनांना वाव, म्हणून Mumbai तुंबते, काय म्हणाले Ambadas Danve?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss