spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज ठाकरेंचा ‘एकला चलो रे’चा नारा आता कोकणाकडे वळणार, विदर्भानंतर आता मिशन कोकण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १८ सप्टेंबर पासून पुढचे पाच दिवस विदर्भ दौऱ्यावर होते. त्यांनी मुंबई ते नागपूर असा रेल्वेने प्रवास केला. त्यानंतर ते नागपुरात दाखल झाले. राज ठाकरेंचं नागपूर रेल्वे स्थानकावर यावेळी जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशांच्या गजरात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं. नागृरात दाखला होताच राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीची मालिका सुरु ठेवली. त्यानंतर आता राज ठाकरे हे ‘एकला चलो रे’चा नारा करत मिशन कोकण सुरु करणार आहेत. विदर्भनंतर राज ठाकरे हे कोकण ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा : 

राशी भविष्य २६ सप्टेंबर २०२२, आज तुमच्या जीवनातील मोठ्या निर्णयाचा दिवस आहे

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भात पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे प्रयत्न केले होते. पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांशी बोलून पक्ष बांधणीवर ते लक्ष देणार आहेत. विदर्भातील विविध जिल्ह्यांना स्वत: राज ठाकरे भेट दिली. तसंच पत्रकार परिषद घेत जनतेला मार्गदर्शन केले. आता ठाकरे पुढच्या महिन्यात कोकणाकडे रवाना होतील. प्रामुख्याने राज ठाकरे तळ कोकणाकडे लक्ष केंद्रित करणार आहेत. पाच दिवसांचा हा दौरा असणार आहे.

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली. म्हणाले, ‘नागपूर शहरातील मनसेची सर्व कार्यकारिणी बरखास्त करत आहे. घटस्थापनेवेळी नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करणार आहे. काही चुकीच्या गोष्टी सुरू होत्या. पक्षस्थापनेच्या १६ वर्षानंतरही नागपूर शहरात मला पक्ष अपेक्षित असलेल्या स्थितीत उभा राहिलेला दिसत नाही. अनेक तरुण इच्छुक आहेत. त्यांना संधी दिली जाईल. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण दौरा करून पुन्हा दोन-तीन दिवसांसाठी मी नागपुरात येणार आहे,’ अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली होती.

स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे

मनसे आणि भाजपाची वाढती जवळीक पाहता आगामी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युतीचे वारे वाहू लागले होते. दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा होत असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. पण या सर्व चर्चांना अखेर आज पूर्णविराम मिळाला आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेने पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे. मुंबईत मनसे सर्व जागांवर म्हणजेच २२७ जागांवर उमेदवार देणार असल्याचं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. मुंबईसोबतच इतरही सर्व महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.

अशा प्रकारे बनवा घरच्या घरी कॅलशियमयुक्त हेल्दी लाडू

Latest Posts

Don't Miss