राहुल गांधीविरोधात मनसेची आक्रमक भुमिका; ‘काळे झेंडे दाखवा’

महाराष्ट्र नवनिर्मण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना काळे झेंडे दाखवण्याचे आदेश दिलेत.

राहुल गांधीविरोधात मनसेची आक्रमक भुमिका; ‘काळे झेंडे दाखवा’

महाराष्ट्र नवनिर्मण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना काळे झेंडे दाखवण्याचे आदेश दिलेत. राहुल गांधी यांनी विनायक सावरकर (Vinayak Savarkar) यांच्याबाबत केलेल्या विधानावरून मनसे आक्रमक झाली आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा उद्या बुलढाण्यात असणार आहे.या ठिकाणी राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांना जमा होण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. शेगावला जा आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवा असे आदेश राज ठाकरेंनी दिलेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या विधानाचा निषेध केलाय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीत गाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असं फडणवीस म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधींच्या विधानाला असहमती दर्शवली आहे. सावरकरांचं देशासाठीचं योगदान अमुल्य आहे. त्यांचा हिंदुत्वाचा विचार काल, आज आणि उद्याही आम्हाला आदरणीय आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदरच आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

काय म्हणाले होते, राहुल गांधी?

भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर टीका केली. एकीकडे देशासाठी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

हे ही वाचा :

Uddhav Thackeray Live : स्मारक ताब्यात घेण्याचं स्वप्न त्यांनी बघावं, मग पाहू – उद्धव ठाकरे

Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे’ मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray : महाराष्ट्रातल्या राजकारणातील भगवं वादळ, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खास फोटो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version