spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ओबीसींच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीसांची आक्रमक भूमिका

काँग्रेसकडून नोकऱ्यांमधील ओबीसींची रिक्त पदे आणि जातनिहाय जनगणना मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली जात असताना दुसरीकडे आता भाजपकडून त्यास प्रत्युत्तर देण्याची रणनीति आखली जात आहे.

काँग्रेसकडून नोकऱ्यांमधील ओबीसींची रिक्त पदे आणि जातनिहाय जनगणना मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली जात असताना दुसरीकडे आता भाजपकडून त्यास प्रत्युत्तर देण्याची रणनीति आखली जात आहे. राज्यातही ओबीसी घटक महत्त्वाचा ठरणार असून आता भाजप आक्रमक झाली आहे.पोहरादेवी येथे झालेल्या सभेत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटावर टीका केली आहे. व्ही. पी. सिंह यांचे सरकार आल्यानंतर भाजपने मंडल आयोग लागू करण्यासाठी आग्रह धरला. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ओबीसी आरक्षणाला विरोध केला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. भाजपा नैसर्गिकरित्या ओबीसी, भटक्या-विमुक्तांचा पक्ष,आमचा डीएनए हाच एकच असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले.


ओबीसीची जनगणना करण्यास नकार नाही…

ओबीसींची जनगणना करायला आमच्या सरकारने कधीच नकार दिला नसल्याचे ही फडणवीस यांनी म्हटले. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

त्यावर केंद्र सरकार अथवा भाजपकडून कोणतेही थेट भाष्य होत नसताना फडणवीस यांनी ओबीसींची जनगणना करण्यास विरोध नसल्याचे म्हटले आहे. जातीनिहाय जनगणना करायला आमचा विरोध नाही. परंतु, जाती-जातीत भांडणं लावू देणार नाही. राजकीय पोळी भाजण्यासाठी असे सर्वे केले जाऊ नये असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

हे ही वाचा: 

अजितदादा मुख्यमंत्री होणार ही न घडणारी गोष्ट- शरद पवार

नवरात्रीच्या उपवासात बनवून पाहा राजगिरा हलवा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss