Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत केली दिवाळी साजरी

Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत केली दिवाळी साजरी

परतीच्या पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार शेत पिकांची नुकसार भरपाई राज्य सरकार कडून देण्यात येणार आहे. परंतु दोन वर्षांनी उत्साहात साजरी करण्यात येणारी दिवाळीत शेतकऱ्यांची कोरडी असल्या कारणाने हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक नेत्यांनी पाहणी दौरा केला मात्र आद्यपही शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत प्राप्त झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आहे.

हेही वाचा : 

सूर्यग्रहणानंतर भाऊबीजेचा शुभ संयोग: जाणून घ्या भाऊबीजेचा पूजा करण्याचा सर्वात शुभ मुहूर्त

औरंगाबादसह मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान सत्तार यांनी अशाच एका शेतकरी कुटुंबाची दिवाळी गोड केली. सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथील आत्महत्याग्रस्त उबाळे आणि अन्वी येथील गाढवे या दोन्ही कुटुंबातील सदस्यांना दिवाळीनिमित्त कपडे, फटाके, मिठाई , जीवनावश्यक वस्तू, किराणा किट भेट देत कृषिमंत्री सत्तार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. तसेच उबाळे कुटुंबासह अन्वी येथील आत्महत्याग्रस्त गाढवे यांच्या वारसाला शासनाच्या वतीनं प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश मंत्री सत्तार यांच्या हस्ते देण्यात आला.

दिवाळीत ध्वनी प्रदुषणाने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो ; अशी घ्या काळजी

घरातील कर्ता पुरुष गेल्याने दिवाळीच्या सणावर दुःखाचे सावट होते. त्यात शेतात झालेल्या नुकसानीने आर्थिक परिस्थितीसुद्धा दिवाळी साजरी करण्यासारखी राहिली नाही. त्यामुळे उबाळे आणि गाढवे दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याचवेळी कृषिमंत्री यांनी या दोन्ही कुटुंबाला भेट देऊन त्यांची दिवाळी गोड केली. तर कृषिमंत्री आपल्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी आल्याने पीडित कुटुंबाला धीर मिळालाच, शिवाय काही अंशी दुःखातून देखील पीडित कुटुंबाला सावरण्यासाठी मदत झाली. तर या दोन्ही आत्महत्याग्रस्त कुटुंबाला घरकुल आणि निराधार योजनेचा लाभ मिळवून देवू, असे मंत्री अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.

भारतीय वंशाचे ऋषी सुनक झाले ब्रिटनचे नवे पंतप्रधान

त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान झाल्याने चव्हाण कुटुंबातील ऋषिकेश चव्हाण या चिमुकल्याने एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीच्या माध्यमातून चव्हाण कुटुंबीयांची परिस्थिती समोर आणली होती. याचा व्हिडिओ देखिल व्हायरल झाला. त्यानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी रात्री ऋषिकेश चव्हाणची भेट घेतली. आणि दिवाळीसाठी चव्हाण कुटुंबीयांना कपडे, मिठाई, फटाके तसेच ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

Exit mobile version