spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांची मेळघाटात हवा

नवनियुक्त कृषी मंत्री अब्दुल सत्तार सध्या मेळघाट दौऱ्यावर आहेत. दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत. या दौऱ्यानिमित्त अब्दुल सत्तार हे त्यांच्या स्टाईलने शेरोशायरी करत विरोधकांवर मिश्किल टिपणी करत आहेत. मेळघाटमधील प्रहार चे आमदार राजकुमार पटेल यांच्याशी संवाद साधताना हसत हसत सत्तार यांनी बच्चू कडून वर निशाणा साधला ये मिळते आहे.’ये मीठा है और वो कडू है..’एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी गुहाटीत गेल्यानंतरही बच्चू कडू यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगत आहे. त्यातच विविध नेत्यांना टोला मारत नकळत अब्दुल सत्तार यांनी बच्चू कडून वर देखील टिपणी केली.

अब्दुल सत्तार यांच्या या दौऱ्यानिमित्त काल त्यांनी रात्री मेळघाटातच मुक्काम केला होता. ते ज्या घरात राहत होते त्या घरात पावसाच्या पाण्यामुळे छप्पर गळत होते. अब्दुल सत्तार यांना शेतकऱ्यांची अशी अवस्था पाहिली नाही त्यांनी लगेचच माझ्याकडून या शेतकऱ्यांना दोन चांगली घर बांधून द्या असे आदेश सहकाऱ्यांना दिले अब्दुल सत्तार यांच्या आदेशानंतर दुसऱ्या दिवशी लगेच जमिनीची मोजमाप करून. आजच त्या शेतकऱ्यांच्या नव्या घराला कामाचे भूमिपूजन करणार असल्याची सत्तार यांनी जाहीर घोषणा केली. इतकेच नव्हे तर त्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नालाही अब्दुल सत्तार उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या उपस्थितीत भाजपची मोठी बैठक

अब्दुल सत्तार यांनी ‘माझा एक दिवस बळीराजासाठी’ ह्या मोहिमे अंतर्गत दौरा सुरू केला आहे. बुधवारी ते रात्री अमरावती जिल्ह्यात दुर्गम मेघाटातील या गावात पोहोचले. चुन्नीलाल पटेल यांच्या घरी त्यांनी अत्यंत साधेपणाने रानभाजी आणि भाकरीचा आस्वाद घेत शेतकऱ्यांशी संवाद साधत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.

टीईटी परीक्षांमधल्या घोटाळ्यामुळे सत्तार त्यांच्या मुलांमुळे अडचणीत आले होते. मंत्रिमंडळ विस्ताराच्या एक दिवस आधी सत्तारांच्या मुलांची नावं समोर आल्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळतं का नाही, याबाबतही शंका उपस्थित करण्यात आली, पण अखेर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. टीईटी प्रकरणात मुलांची नावं आल्यानंतर शिवसेना नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्तारांवर आणखी आरोप केले.

सूर्यकुमारच्या षटकारांच्या फटकेबाजीवर विराटने केला सलाम 

Latest Posts

Don't Miss