spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरेंच्या आधी कृषी मंत्री पोहोचले नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या भेटीला

आज उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा अनेक माध्यमानी दाखवल्या नंतर आज राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दखल घेतली आहे. तर कृषिमंत्री सत्तार यांनी गंगापूर तालुक्यातील चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन आर्थिक मदत केली आहे. तसेच सरकार लवकरच राज्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत देखील करणार असल्याचे आश्वासन देखील दिले आहे.

काही दिवसांपासून सुरूअसलेल्या परतीच्या पावसाने मराठवाड्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असून, पीक मातीमोल झाली आहे. दिवाळी सारखा सण सुद्धा शेतकरी साजरा करू शकत नसल्याची परिस्थिती आहे. अशात बळीराजाला मदतीची आणि धीर देण्याची गरज आहे. याच बातमीची दखल कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली असून, शुक्रवारी रात्री कृषीमंत्र्यांनी चव्हाण कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी अब्दुल सत्तार यांनी चव्हाण कुटुंबीयांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच लवकरच शासकीय मदत देण्याची आश्वासन देखील दिले.

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीने चव्हाण कुटुंबीयांवर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न या कुटुंबासमोर उभा राहिला होता. दरम्यान कृषिमंत्री यांनी बातमी पाहिल्यानंतर चव्हाण कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला आहे. यावेळी अब्दुल सत्तार यांनी या कुटुंबातील सर्व सदस्यांना दिवाळीसाठी नवीन कपडे घेऊन दिले. सोबतच ५० हजार रुपयांची रोख मदत ही केली. तर लवकरच शासकीय मदत देखील खात्यावर जमा होईल असे आश्वासन दिले.

उद्धव ठाकरे करणार नुकसानग्रस्तांची पाहणी

काही दिवसांपासून सुरूअसलेल्या परतीच्या पावसाने मराठवाड्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असून, पीक मातीमोल झाली आहे. दिवाळी सारखा सण सुद्धा शेतकरी साजरा करू शकत नसल्याची परिस्थिती आहेत. अशात बळीराजाला मदतीची आणि धीर देण्याची गरज आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज औरंगाबादचा दौरा करत नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. तसेच त्यांच्या व्यथा देखील जाणून घेणार आहे. गंगापूर तालुक्यातील दहेगाव, पेंढापूर या दोन गावातील नुकसानीची ठाकरे पाहणी करतील.

 

हे ही वाचा :

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर

राशी भविष्य – २३ ऑक्टोबर २०२२ – आजचा दिवस मंगलमय वातावरणात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss