spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरेंच्या आधीच, शनिवारपासून शिंदे-फडणवीसांचा एकत्रित महाराष्ट्र दौरा

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे हे राज्याचा दौरा करणार आहेत. ठाकरेंनी हा दौरा जाहीर केल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) देखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत.

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे हे राज्याचा दौरा करणार आहेत. ठाकरेंनी हा दौरा जाहीर केल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) देखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिंदे-फडणवीसांचा दौरा निघणार आहे. शनिवारपासून नंदुरबार मधून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

मागच्या दोन महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या भेटीला उद्धव ठाकरे गेले होते. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका देखील झाली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होण्याआधीच शिंदे फडणवीस महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाचे बालेकिल्ले असलेल्या भागात करणार शिंदे फडणवीस एकत्रित दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

उद्धव ठाकरेंचा हा दौरा जाहीर झाल्यानंतर आज शिंदे-फडणवीसांनी एकत्रित दौरा आयोजित केला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिंदे-फडणवीसांचा दौरा निघणार आहे. शनिवारपासून नंदुरबार येथून ह्या दौऱ्याला सुरुवात होईल. दौऱ्यामध्ये ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्यामुळे कुणाच्या दौऱ्याला किती प्रतिसाद मिळतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

राज्यातील २५ जिल्हा परिषदा, २३ महापालिका, २२० नगरपालिका, नगरपंचायती आणि २८४ पंचायत समित्यांची मुदत संपली आहे. त्यावर आता प्रशासक आहेत. मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या या निवडणुकांच्या निकालावर शिंदे व ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व अवलंबून असेल. नेमकी खरी शिवसेना कोणाची अन्‌ जनाधार कोणाकडे आहे हे स्पष्ट होईल. त्यात महाविकास आघाडी होईल की नाही हे अस्पष्ट आहे. परंतु, केंद्रात व राज्यात सत्तेत असलेला भाजप शिंदे गटाला सोबत घेऊन या निवडणुका लढेल, हे निश्चित आहे. त्यामुळे अधिकाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांवर विजय मिळविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

हे ही वाचा:

अरविंद केजरीवाल यांचे केंद्र सरकारला आवाहन; ‘नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी गणेशाचे फोटो’

कर्नाटकमध्ये सुंदर हत्तीचं निधन होऊनही न कळवल्याने भाविकांमध्ये नाराजी

‘चलो अयोध्या’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार रामलल्लाच्या दर्शनाला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss