अजितदादांचं Pink Politics उधळणार रंग; महाराष्ट्र जनसन्मान यात्रेला झाला आरंभ

अजितदादांचं Pink Politics उधळणार रंग; महाराष्ट्र जनसन्मान यात्रेला झाला आरंभ

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांचे दौरे हे वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत. या दौऱ्यांमधून स्वपक्षाचा विस्तार आणि स्वपक्षाच्या ज्या जागा आहेत त्या जिंकून याव्यात म्हणून हे दौरे केले जात आहेत. त्याचबरोबर पक्षबांधणीसाठी अनेक नवनवीन योजना आखल्या जात आहेत. त्याचप्रमाणे या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष हे आपली पोळी कशी भाजेल, लोकांच्या मनात स्थान कसे निर्माण होईल व अत्यधिक मते कशी प्राप्त होतील या दिशेने चोख काम पार पाडण्यासाठी सुरुवात केलेली दिसून येते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण ताकदीने तयारी चालू केली आहे. सोबतच अजित पवार गटाने या निवडणुकीसाठी गुलाबी रंगाचा आधार घेतल्याचे दिसून आले. त्याच गुलाबी रंगावर स्वतःची छटा उमटवण्याचे कार्य पुन्हा नव्याने दिसून आले आहे. 

या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचं ठरवलं आहे. त्यांच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेला आजपासून (८ ऑगस्ट) सुरुवात झाली. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून या यात्रेला सुरुवात होणार असून त्या निमित्ताने या यात्रेसाठीच्या बसवर लाडकी बहीण या योजनेची माहिती देण्यात आलेली आहे. तसेच यात्रेच्या आयोजनासाठी नेमण्यात आलेल्या सदस्यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट घातलेले आहे. थोडक्यात काय तर अजित पवार हे  गुलाबी रंगाचा आधार घेताना दिसले. या गुलाबी रंगाचे एक रहस्य असेही असू शकेल की हे सरकार सध्या महिलांना केंद्रस्थानी ठेऊन कार्य करत आहे आणि त्याचे हे द्योतक असू शकते. 

या दौर्यासाठीची गुलाबी बस कशी आहे ?

अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुरुवात होणार आहे. यात्रेसाठी राष्ट्रवादीने चांगली तयारी केली आहे. अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनांना गुलाबी रंग देण्यात आला आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते गुलाबी रंगाची बस आणि गुलाबी रंगाच्या चारचाकीतून प्रवास करणार आहेत. या यात्रेतील बसवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जनसन्मान यात्रेच्या आयोजनासाठी नेमण्यात आलेल्या टीम मेंम्बरनेही गुलाबी रंगाचेच जॅकेट्स परिधान केले आहेत. या यात्रेच्या स्वागताला महाविद्यालयीन तरुण-तरुणीची उपस्थिती असणार आहे. सोबतच दिंडोरी भागात विमानतळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे आणि होर्डिंग्ज लावून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या यात्रेसाठी अजित पवार तसेच इतर नेत्यांचे ओझर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर जनसन्मान यात्रेला प्रारंभ होईल.   

कशी आहे या दौऱ्याची आखणी ?

पुढच्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आतापासूनच कंबर कसली आहे. सन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार राज्यातील जास्तीत जास्त जनतेशी संपर्क साधणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या योजनेमुळे महिलांची मतं आम्हाला मिळू शकतात, अशी आशा महायुतीच्या घटकपक्षांना आहे. म्हणूनच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांच्या जनसन्मान यांत्रेत अधिकाधिक गुलाबी रंग वापरण्याचा प्रयत्न केला जातोय.  त्यामुळे अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला यश मिळणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आता अजित पवारांचं हे Pink Politics राज्यात काय कामगिरी करणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

हे ही वाचा :

Paris Olympics 2024 : आधी Vinesh Phogat आणि आता Antim Panghal; नक्की चाललय तरी काय आणि कुस्तीपटूच का ?

“कोणीच स्वत:ला देवापेक्षा मोठं मानू नये”; बांग्लादेश प्रकरणावरून Uddhav Thackeray यांचा खडाजंगी टोला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version