पुष्पहार, डीजेच्या दणदणाटात अजितदादांचं शिंदेवाडीत स्वागत

कोल्हापुरला निघालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महामार्गावर भोर तालुक्यात कापुरव्होळ येथे विक्रमदादा खुटवड युवा मंचच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात येऊन फुलांची उधळण करत एकच वादा अजित दादा या घोषणेचा जय घोष करण्यात आला.

पुष्पहार, डीजेच्या दणदणाटात अजितदादांचं शिंदेवाडीत स्वागत

कोल्हापुरला निघालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महामार्गावर भोर तालुक्यात कापुरव्होळ येथे विक्रमदादा खुटवड युवा मंचच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात येऊन फुलांची उधळण करत एकच वादा अजित दादा या घोषणेचा जय घोष करण्यात आला. राज्यातील राजकारणातील बदललेल्या भुमिके नंतर अजित पवार प्रथमच भोर तालुक्यात येत होते भोर वेल्हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचे शिवापुर टोलनाक्यावर जंगी स्वागत झाल्यावर राष्ट्रवादीचे तालुक्यातील युवानेते विक्रम खुटवड यांनी देखिल युवामंचच्या वतीने कापुरव्होळ येथे त्यांचे जोरदार स्वागत केले

शिंदेवाडी इथं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं भला मोठा पुष्पहार व डीजे लावून, फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं. यावेळी अजितदादांच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारण्यात आली होती. तसेच शरद पवार आल्यानंतर त्या गाडीत सारथी झालेले आमदार मकरंद पाटील यावेळी अजित पवार यांच्या गाडीचे सारथी झाले. आज सकाळपासून स्वागतासाठी शिंदेवाडी या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांनी अजितदादांच्या गाडीचे सारथी म्हणून पुढच्या दिशेनं प्रवास केला.

यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. रामराजे हे गाडीतून उतरून स्वागत मंडपात स्वागतासाठी आले. दरम्यान, धनजंय मुंडे यांनी गाडीतच बसणं पसंद केलं. या प्रसंगी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी करत, फुलांची उधळण करत अजित पवार यांचं स्वागत केलं. तसेच अजित पवार यांचा शिंदेवाडी ग्रामपंचायत सरपंच व महिलांनीही विशेष सत्कार केला. यावेळी शिरवळ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, अजित पवारांचं आगमन झाल्यावर या गर्दीवर पोलिसांना नियंत्रण मिळवता आलं नाही. त्यामुळं त्यांची दमछाक झाली. आज कोल्हापुरात अजितदादांची सभा होत आहे.

हे ही वाचा: 

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर गाडी चालवताना राहा सावध, ‘हे’ नियम मोडल्यास…

शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याकडून गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version