spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अमित शाहांच्या दौऱ्यात अजित पवार अनुपस्थित…

राज्यासह संपूर्ण देशभरामध्ये काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका या पार पडला. आणि या लोकसभा निवडणुकीत एक वेगळंच चित्र सर्वांच्या समोर आले त्यामुळे आता सर्वांचे लक्ष हे राज्याच्या विधानसभा निवडणुकींकडे लागले आहे.

राज्यासह संपूर्ण देशभरामध्ये काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका या पार पडला. आणि या लोकसभा निवडणुकीत एक वेगळंच चित्र सर्वांच्या समोर आले त्यामुळे आता सर्वांचे लक्ष हे राज्याच्या विधानसभा निवडणुकींकडे लागले आहे. विधानसभा निवडणुका या तोंडावर आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष आता ऍक्शन मोड मध्ये आल्याचे चित्र एकंदरीत दिसून येत आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना मात्र एक वेगळाच वळण लागलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अफाट घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे महायुतीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. तसंच सध्या गणेशोत्सव सुरु आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. अमित शाह यांचा ताफा मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाला. काल अमित शाह यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या घरी जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. अमित शाह यांच्या या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरु आहे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

५ ऑगस्टला राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीलाही अजित पवार उपस्थित नव्हते. काल बारामतीतील कसब्यात असणाऱ्या ‘राष्ट्रवादी भवन’मध्ये काही नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. यावेळी अजित पवार उपस्थित होते. हा बारामती दौरा आटोपता घेत अजित पवार तातडीने मुंबईत आले. मात्र मुंबईत असूनही अजित पवारांनी अमित शाहांची भेट न घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. काल रात्री अजित पवार हे मुंबईत आले. त्यानंतर अजित पवार अमित शाहांना भेटणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र अद्यापपर्यंत त्यांची भेट झाली नसल्याचं समोर आलं आहे. मुंबईत असतानाही अजित पवार आणि अमित शाह यांची भेट न झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

काल रात्री सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह यांनी भाजप नेत्यांची बैठक घेतली. तर वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली. मात्र यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र उपस्थित नव्हते. अजित पवार आज मुंबईत आहेत. मात्र त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा:

Ganeshotsav 2024: एक वाटी गव्हाचे पीठ आणि झटपट मोदक तयार…

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा!…

Ganeshotsav 2024: यंदाच्या गणपतीत बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक

Latest Posts

Don't Miss