Maharashtra Politics : अजित पवार नशिकात, तर शिंदे गटाच्या मेळाव्याचे नंदुरबार येथे शक्तिप्रदर्शन

Maharashtra Politics : अजित पवार नशिकात, तर शिंदे गटाच्या मेळाव्याचे नंदुरबार येथे शक्तिप्रदर्शन

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून आज सकाळी ११ वाजता नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे.

तब्बल २२ कोटी रुपये खर्च करून नंदुरबार नगर परिषदेची भव्य इमारत तयार करण्यात आली आहे. नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील जवळपास सात मंत्री व १४ आजी माजी खासदार आमदार यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

किशोरी पेडणेकर यांची पोलिसांकडून चौकशी, एसआरए घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल

त्यानंतर दुपारी दीड वाजता नंदुरबार शहरातील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची जाहीर सभा होणार आहे. या सभेला जवळपास २० हजार नागरिक उपस्थित राहण्याची सोय करण्यात आली आहे.

त्याचबरोबर आज अनेक महिन्यानंतर अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर येत असून ते नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात भेटी देणार आहेत. विशेष म्हणजे कालपासून एअर बस प्रकल्पाबाबत राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदूरबार मध्ये यावर काय भूमिका मांडता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्याबरोबर धनंजय मुंढे हे देखील नाशिकमध्ये असून सध्या राज्यात राजकीय नेत्यांचे दौरे वाढले असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घणाघात, ”सरकारमध्ये ताळमेळ नाही, उद्योगमंत्र्यांकडून राज्यातील जनतेची दिशाभूल”

अजित पवारांची सुरक्षा कमी केली…

दरम्यान महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने काढली आहे. मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवण्यात आली आहे. त्याशिवाय जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाही जैसे थे ठेवण्यात आली आहे. महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढत शिंदे सरकारनं विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. शिंदे सरकारच्या या निर्णायावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यामध्ये अजित पवार यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंढे यांचीदेखील सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार आणि मुंढे याबाबत काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

“महाराष्ट्रात असं कधी बघितलं नव्हतं” : अजित पवार 

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये ‘खोके’वरून सुरू असलेल्या वादाचा संदर्भ यावेळी अजित पवारांनी दिला. “सध्या सत्ताधारी पक्षाचे आमदार एकमेकांवर आरोप करतायत. खोक्यांचा उल्लेख करत आहेत. चौकशांची मागणी करत आहे. आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात असं काही घडलं नाही. मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असायला हवा. इथे मंत्रीच जिल्हाधिकाऱ्यांना विचारतायत की ‘तुम्ही दारू पिता का?’ महाराष्ट्रात असं कधीच बघितलं नव्हतं”, असं अजित पवार म्हणाले.

सणासुदीत तेलकट खाल्याने पोटाला त्रास झाला आहे का? तर करा हे उपाय

Exit mobile version