spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PhD वरील मुद्यावर अजित पवारांनी केली दिलगिरी व्यक्त, म्हणाले…

आज अजित पवारांनी त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

मंगळवार दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी विधान परिषदेत एक वक्तव्य केले. अजित पवार यांच्या वक्तव्यावरून सभागृहाबाहेर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. “पीएचडी करून विद्यार्थी दिवे लावणार आहेत का?” असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. अजित पवारांच्या या वक्तव्याचा आता प्रत्येक क्षेत्रातून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावर आज अजित पवारांनी त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

आज सकाळी माध्यमांशी बोलत असताना अजित पवारांनी त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पीएचडीबाबत माझा तोंडातून शब्द गेला काय दिवा लावला जाणार. त्याचा गाजावाजा करण्यात आला. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त केली आहे, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे. अनेकांनी राजकिय नेत्यांवर पीएचडी केली. पीएचडी करण्यावर दुमत नाही. पीएचडी करण्याबाबत विषय निवडीबाबत समिती नेमायला हवी. अनेक जण विविध विषयात पीएचडी करतात. जर्मन भाषेत पीएचडी केली तर अधिक फायदा होईल. असेही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

तसेच पुढे बोलत असताना पवार म्हणाले आहेत की, जुन्या पेन्शन संदर्भात काल बैठक झाली. बैठकीला विविध संघटनेचे नेते होते. जुन्या पेन्शनबाबत अहवाल समोर ठेऊन त्यांना समजावलं अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन अजित पवारांनी संपकऱ्यांना केले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत पेन्शनसंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असेही अजित पवार म्हणाले.

 

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

मंगळवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा संवाद झाला. सारखी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या फेलोशिपबाबबत सतेज पाटलांनी सरकारला विचारणा केली. त्यावर “फेलोशिप घेऊन विद्यार्थी काय करणार आहेत?” असा प्रश्न अजित पवारांनी केला. त्यावर सतेज पाटील यांनी “हे विद्यार्थी पीएचडी करतील”, असं उत्तर दिलं. यावर बोलताना अजित पवारांनी “पीएचडी करून काय दिवा लावणार आहेत? या विद्यार्थ्यांनी फेलोशिपऐवजी एमपीएससीसह आयएएस, आयपीएस, आयआरएस अशा इतर स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करायला हवेत”, असं अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा : 

KL Rahul ने बुमराहबद्दल सांगितली एक गोष्ट, म्हणाला…

लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss