spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर व्हायला हव्यात, अजित पवार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावर भाष्य करताना राष्ट्रवादी नेते अजित पवार म्हणाले, “आम्ही सरकार असताना इतर मागास समाजाला आरक्षणासाठी आम्ही खटाटोप केला. आमची अपेक्षा होती की, ताबडतोब निवडणुका लागाव्यात आणि सर्वांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. परंतु नंतरच्या काळात राजकीय स्थित्यंतर अशी घडली की, सततच या निवडणुका पुढे पुढे चालल्या आहेत. ९२ नगरपरिषदांच्या ओबीसी आरक्षणावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलत आहे.” असं म्हणत राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना बोललं.

हेही वाचा : 

Sanjay Raut : नेहरुंपासून ते मोरारजींपर्यंत शिवरायांचा अवमान करणाऱ्यांनी माफी मागितली होती; राऊत म्हणाले…

राज ठाकरेंचे विचार त्यांच्यासोबत माझे विचार माझ्यासोबत आहेत. आमच्या पोटात एक असं नसतं. कुणीतरी काहीतरी बोलतो आणि बेरोजगारी , शेतकऱ्यांचे वगैरे मुद्दे मागे पडतात आणि इतर विषयांवर चर्चा सुरु होते. तसं न होता लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सीमाभागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सध्याच्या राज्य सरकारने तरतूद करावी. आमच्यावेळी अशी मागणी झाली असती तर आम्ही लगोलग तरतूद केली असती, असंही अजित पवार म्हणालेत.

राज्यपालांचं वक्तव्य खपवून घेणार नाही

राज्यपाल कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्र खपवून घेणार नाही. त्यांच्याकडून वारंवार वादग्रस्त विधाने होत आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन कुणीच करू नये. राज्यपालांना पदावर बसवणाऱ्यांनी त्यांना समज द्यावी. यासंदर्भात आता वरिष्ठांनी विचार करण्याची वेळ आली आहे कारण महत्त्वाचे विषय सोडून ते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत असं पवार म्हणाले.

water cut मुंबईत बीएमसीच्या १० वॉर्डांमध्ये चोवीस तास पाणीकपात, कोणत्या भागात फाटका बसणार

Latest Posts

Don't Miss