उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देखील करोना संसर्ग झाला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाली आहे. स्वतः अजित पवार यांनीच ट्विट करत याबाबत माहिती दिली. या ट्वीटमध्ये त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं सांगितले केलं. तसेच लक्षणं दिसल्यास तत्काळ करोना चाचणी करण्यास देखील सांगितले आहे.
अजित पवार ट्विट करत म्हणाले, “काल मी करोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं करोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली करोना चाचणी करून घ्यावी.”
याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देखील करोना संसर्ग झाला होता. उद्धव ठाकरे मातोश्रीवरूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत आहेत. भगतसिंग कोश्यारी यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.रविवारी कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आला आहे, असे अजित पवार यांनी सांगितलं. महत्त्वाची बाब म्हणजे, अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती एकदम चांगली आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अजित पवार औषधोपचार घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Exit mobile version