मोदींचा फोटो न लावता निवडून दाखवा, अजित पवारांची भाजपवर शाब्दिक फेटकेबाजी

मोदींचा फोटो न लावता निवडून दाखवा, अजित पवारांची भाजपवर शाब्दिक फेटकेबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन पार पडले, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाच्या अगोदर अजित पवार यांचे भाषण होणार होते. मात्र त्याआधीच व्यासपीठावरुन अजित पवार बाहेर गेले, खरं तर अजित पवार हे वॉशरुमला गेले आणि त्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. त्यानंतर माध्यमांनी अजित पवार यांना यासंदर्भात विचारल्यानंतर आम्ही वॉशरुमलाही जायचं नाही का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडून येतात, कोणाच्यात हिम्मत असेल तर मोदी साहेबांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा अशा शब्दात भाजपवाल्यांना त्यांनी फटकारले आहे. त्यामुळे काल दिवसभर अजित पवार यांच्या याच वाक्याची चर्चा होती.

हेही वाचा : 

शिंदे गटाचा दसरा मेळाव्या संबंधित आज महत्त्वाची बैठक, शिवाजी पार्क शिवाय इतर जागांची चाचपणी सुरु

अजित पवार यांनी राज्याचे मुख्यंमत्री शिंदे यांच्यावरही निशाणा साधला

ते म्हणाले,”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पैठण दौरा झाला. त्यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आदेश काढले गेलेत. जर अंगणवाडी सेविका सभेला गेल्या मग मुलांकडे लक्ष कोण देणार? त्यांच्या शाळेचं काय होणार? गर्दी जमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर ही परिस्थिती आली असेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आम्ही पण सत्तेत होतो, पण अशा प्रकारचे आदेश कधीच काढले नाहीत”.

रस्त्यात अचानक पेटती गाडी पाहत मुख्यमंत्र्यांनी थांबवला आपल्या गाडीचा ताफा

“लम्पी आजारामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून त्यामुळे दूध व्यवसायावर परिणाम झाला आहे. हा आजार झालेल्या प्राण्यांचे दुधही शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे येत्या हंगामातील साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी लम्पी आजारावर आळा घालणे गरजेचं आहे. अशा प्राण्यांना विमा संरक्षण देण्यासाठीही उपाययोजना सरकारने कराव्यात. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे.” असंही अजित पवारांनी सांगितलं आहे.

सदा सरवणकर यांची पिस्तूल जप्त

Exit mobile version