Ajit Pawar यांनी शिंदे-फडणवीस सरकार खडेबोल सुनावले

शिवसेनेने वृत्तपत्रामध्ये दिलेल्या जाहिरातींवरून राजकारणामध्ये राजकारण तापलेले आहे. त्या जाहिरातींवरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका होत आहे.

Ajit Pawar यांनी शिंदे-फडणवीस सरकार खडेबोल सुनावले

शिवसेनेने वृत्तपत्रामध्ये दिलेल्या जाहिरातींवरून राजकारणामध्ये राजकारण तापलेले आहे. त्या जाहिरातींवरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका होत आहे. १६ जून रोजी जळगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज अजित पवारांनी कृषी विभागाच्या धाडी आणि राज्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर चांगलेच धारेवर आणले आहे. जळगाव मध्ये असताना विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. अकोला येथे बोगस बियाणे, खते विक्रेत्यांवर छापे टाकणाऱ्या पथकामध्ये खासगी व्यक्तींचा समावेश असल्याचा त्याचबरोबर या पथकांमध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे स्वीय सहायक (पीए) सहभागी असल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर बोलताना अजित पवार म्हणाले की, खतांच्या किमती वाढवल्या जात आहेत, साठेबाजी केली जात आहे. एवढेच नाही तर बियाणांचा काळाबाजार सुरुआहे. छापेमारी या कारणाकरिता करतोय असं कृषी विभाग दाखवत आहे. पण छापेमारी करताना मंत्र्यांचेच पीए पाहायला मिळतायतं. मंत्र्यांवर केवलवाणी अवस्था येते. ते म्हणतात की हा माझा पीए नाही, रेकॉर्डवर बघीतलं तर तो त्यांचात पीए निघतोय असे अजित पवार म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले की, प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू झाला असून लोकांमध्ये प्रचंड अस्वस्तता आहे. सरकार टिकवण्यासाठी ते ४० आमदार नाराज होऊ नयेत म्हणून ते आमदार सांगतली ती गोष्ट केल्या जात आहेत. मग ते नियमात बसत असेल किंवा नसेल. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज बदली झाली, दुसऱ्या दिवशी स्थगिती आली आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्याच ठिकाणी बदली करण्यात आली. प्रशासनामध्ये बदल्या करण्याचा अधिकार जरूर सरकारचा आहे. मी विरोधाला विरोध करणारा किंवा प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणारा माणूस अजिबात नाही असे अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा : 

बिपरजॉय चक्रीवादळाचा लांबपल्याच्या गाड्यांवर मोठा परिणाम, पश्चिमी रेल्वेकडून नवीन अपडेट जारी

साखर कारखान्यासाठी असलेली २५ किलोमीटरची अट समितीद्वारे होणार शिथील, मुख्यमंत्री

International Yoga Day 2023: जाणून घ्या योगाचे प्रकार फक्त एका क्लिकवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version