spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पहाटेच्या शपथ विधीचं रहस्य अखेर अजित पवारांकडून उलगडणार, आत्मचरित्र लिहिन…

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ ही सुरु आहे. त्यातच आज महाराष्ट्रातील पहाटेच्या शपथविधीच्या देखील जोरदार चर्चा या सुरु आहेत.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ ही सुरु आहे. त्यातच आज महाराष्ट्रातील पहाटेच्या शपथविधीच्या देखील जोरदार चर्चा या सुरु आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेचा शपथविधी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण ठरला आहे. त्यामुळेच, अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीवर सातत्याने प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांची प्रतिक्रिया ही दिली आहे. तेव्हा बोलत असताना अजित पवार म्हणाले आहेत की यासंदर्भात यासंदर्भात मी मला जेव्हा वाटेल तेव्हा सविस्तर बोलेन. सध्या माध्यमांकडून अजित पवार यांना सातत्याने प्रश्न केले जात आहेत. म्हणून अजित पवार यांनी त्यांची स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. आत्मचरित्र लिहिन तेव्हा सगळं खरं खरं लिहीन, असे पवार यांनी म्हटले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुन्हा एकदा एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत पहाटेच्या शपथविधी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा अजित पवार यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तेव्हा अजित पवार म्हणाले आहेत की, त्यावर, मी याबाबत आत्ताच बोलणार नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा, आत्ता हा शब्द निघून जाईल आणि मी बोलेन असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच, ज्यावेळी मला वाटेल आत्मचरित्र लिहावं, त्यावेळी मी लिहीन. आत्मचरित्रात सगळ्या गोष्टी लिहिन. सुरुवातीपासूनच सगळं लिहीन, ते वाचल्यावर कुणाला काय वाटेल, ते वाटेल पण मी सगळं खरं खरं लिहिन. मला त्याची किंमत मोजावी लागली तरी मी ते लिहीन, खरं सांगेन असे अजित पवार यांनी म्हटले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीबद्दल मोठा गौप्यस्फोट केला होता. या शपथविधीची माहिती शरद पवारांना होती, असे ते म्हणाले. त्यानंतर, पुन्हा एकदा भाजप-राष्ट्रवादी युतीची चर्चा राज्यात रंगली होती. मात्र, फडणवीसांचे ते विधान असत्य असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं.

हे ही वाचा :

Exclusive , संजय राऊतांचा अत्यंत विश्वासू सहकारी बाळा कदम पोलिसांच्या ताब्यात

Anganwadi Worker Protest, अंगणवाडीतील महिलांना राज्य सरकारचे सकारात्मक आश्वासन…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss