spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजित पवारांनी खंत व्यक्त केली म्हणाले, आम्हला निमंत्रण…

मुंबई : राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार असलायची कुणकुण लागली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. 10 पेक्षा अधिक मंत्र्यांना मंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या 8 ऑगस्ट रोजी खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे.

परंतु विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले, नुकताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा दिल्ली दौरा झाला आहे. आणि आजही त्यांची बैठक झाली आहे. त्यामुळे उद्या मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते आहे. असेही ते म्हणाले.

अजित पवार यांनी पुढे म्हटले, “विधानसभेच्या विरोधीपक्ष नेता या नात्याने मला आज पत्र मिळाले आहे. उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी विरोधीपक्षांची नावे देण्यासाठी हे पत्र मला प्राप्त झाले आहे. त्यामुळे उद्या या समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. तसेच विविध प्रसार माध्यमातून मला मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत माहिती मिळाली आहे. मात्र, विरोधीपक्ष नेता म्हणून मला अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळालेली नाही”, अशी माहिती विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा : 

पंतप्रधान ओबीसी समाजाचा असूनही 8 वर्षात समाजाला काय मिळाले? नाना पटोलेंचा सवाल

Latest Posts

Don't Miss