Dasara Melava : दसरा मेळाव्यादिवशी अजित पवार पहिलं भाषण कोणाचं ऐकणार? पवारांनी दिली प्रतिक्रिया

Dasara Melava : दसरा मेळाव्यादिवशी अजित पवार पहिलं भाषण कोणाचं ऐकणार? पवारांनी दिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असलयाचे जवळपास निश्चित झाले आहे. एकाच दिवशी हे दोन बडे नेते दसरा मेळाव्यात भाषण करणार आहेत. याची वेळ अद्याप निश्चित झाली नसली तरी दोघांचं भाषण एकाचवेळी सुरु झालं तर नेमकं भाषण ऐकायचं कुणाचं हा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भात राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना हा प्रश्न विचारल्यास त्यांनी थेट उत्तर दिलं आहे.

हेही वाचा : 

Congress President Election : दिग्विजय सिंह यांची काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकीतून माघार

अजित पवारांनी म्हटलं की, मोठे राजकीय मेळावे घडतात, तेव्हा पोलिस यंत्रणा लागते. आता त्या दोघांमध्ये इर्षा निर्माण झाली आहे. दोघांचं भाषण एकाच वेळी सुरू झालं तर आधी उद्धव ठाकरेंचं बघणार. नंतर एकनाथ शिंदेंचं बघणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. शेवटपर्यंत शिवसेनेसोबत ऋणानुबंध जपू, असंही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे हे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या त्रासाला कंटाळून २०१४ ला भाजप विरोधात उठाव करणारे पहिले मंत्री होते, असा दावा उद्धव ठाकरे गटातले खासदार विनायक राऊत यांनी केला होता. त्याला काँग्रेस नेते काँग्रेसचे अशोक चव्हाण यांन दुजोरा दिला होता. २०१४ मध्ये एकनाथ शिंदे हे सरकार स्थापन करण्याचा प्रस्तव घेऊन आले होते, असं चव्हाण म्हणाले. मात्र सगळ्या प्रकरणाला राष्ट्रवादीकडून पूर्ण विराम देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Carrom Game : ‘गुजरातमधील ३६व्या राष्ट्रीय खेळांमध्ये ‘कॅरम’ खेळाचा समावेश का नाही?’

पवार म्हणाले, ‘हे सगळे २०१४ मध्ये घडले आहे, आता आपण २०२२ मध्ये आहोत. थोड्याच दिवसांत २०२३ सुरू होईल. त्यामुळे शिळ्या कढीला ऊत आणण्यात अर्थ नाही. जनतेला या सगळ्या वादांमध्ये रस नाही. बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी अशाप्रकारची वक्तव्यं केली जात.’ असे अजित पवार यांनी म्हटले.

शिंदे पाठोपाठ ठाकरे गटाचा देखील टीझर लाँच; एक नेता, एक झेंडा, एक मैदान…

Exit mobile version