शिंदे सरकारमधील अस्वस्थतेवर अजित पवारांनी साधला निशाणा म्हणाले, ‘थोडं थांबा, सुरू झालंय…’

शिंदे सरकारमधील अस्वस्थतेवर अजित पवारांनी साधला निशाणा म्हणाले, ‘थोडं थांबा, सुरू झालंय…’

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार पाडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आणलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार आपल्यासोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या बंडामुळे उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याबाबत विरोधकांकडून दावे करण्यात येत आहेत. त्याच बरोबर आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवरुन माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे.

विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले की, जोपर्यंत आमदारांचं संख्याबळ १४५ आहे, तोपर्यंत सरकार चालणारच. मात्र मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे कळेल. ज्या आमदारांना सोबत घेतलं, त्यांना दिलेल्या आश्वासनबाबत आता अस्वस्थता सुरू झाली आहे. त्यामुळे थोडं थांबायला हवं. त्यामुळे योग्य वेळ येण्याची वाट पाहतोय, असंही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा : 

राशी भविष्य १६ ऑक्टोबर २०२२ , आपल्या व्यवहाराबाबतची गुप्तता पाळणे तुमच्या हिताचे ठरेल

दरम्यान महाराष्ट्रात जे सुरू आहे ते लोकशाहीला घातक आहे. अशा पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण झालं तर स्थिरता राहणार नाही. अशा प्रकारचे पायंडे महाराष्ट्राला आणि देशालाही परवडणार नाही. हे सर्व शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. शिवाय शिवसैनिकांनाही हे आवडलेलं नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

‘राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महाविकासआघाडी सरकारने दिलेला निधी रद्द करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. यावरुन अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. “सरकार येत असतात, सरकार जात असतात. त्यामुळे मागच्या सरकारने दिलेला निधी रद्द करण्याचे पायंडे पडायला नकोत. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही”, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

‘आमदारांची नाराजी’

हिंदुत्वासाठी शिंदे सरकारसोबत आलेले मुस्लिम आमदार अब्दुल सत्तार यांनी सुमारे ८५ कोटी रुपयांच्या विकासकामांची लांबलचक यादी मुख्यमंत्र्यांना दिली. या सर्व विकासकामांमुळे ते आपापल्या मतदारसंघात आपले पाय बळकट करतील, अशी आशा आमदारांना होती, मात्र आता तसे होताना दिसत नाही. त्यांची यादी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळल्याचे कारण आहे.

Nagpur : नागपुरात भाजपला मोठा धक्का, 13 पैकी 9 पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार स्वत: अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते असं बोलत आहेत. महाराष्ट्रात अतिशय स्थिर आणि गतीशील सरकार आलं आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा निवडून येऊ, असंही फडणवीसांनी म्हटलं.

सर्दी आणि खोखल्यावर त्रिकटू चूर्णाचे रामबाण उपाय

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version