Thursday, July 4, 2024

Latest Posts

आरक्षणाचा मुद्दा पेटला पण “दादा” गेले कुणीकडे ? Ajit pawar झाले नॉटरिचेबल

महायुतीत मतमतांतर दिसून आलं. छगन भुजबळांनी जागा वाटपासंदर्भात भाष्य केलं मात्र त्यावर राष्ट्रवादी आणि महायुतीत संभ्रम नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आणि त्यानंतर अजित पवार (Ajit pawar) चक्क नोट रिचेबल झाल्याचं दिसलं. 

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ होताना दिसत आहे. त्यातच नीट ची परीक्षा, आरक्षण यांसारख्या घडामोडी घडत असताना राज्य सरकार आपलं मत वेळोवेळी बजावत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit pawar) असं या राज्यात महायुतीचं सरकार आहे. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा तोंडावर असताना नवनवीन घटनांमुळे राजकारणात वादंग पेटत आहे. राज्यसरकारकडून या सगळ्याप्रकरणाची दखल घेतली जात आहे. सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी संवाद साधून सरकारची भुमिका स्पष्ट करत आहेत मात्र या सगळ्यात दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit pawar) हे कुठेतरी नॉट रिचेबल असल्याचं चित्र दिसून येतं आहे. खरं तर हे काही नवीन नाही पण जेव्हा महत्त्वाचा मुद्दा पेटत असताना अजित दादाचं(Ajit pawar) गायब होणं याकडे लक्ष वेधलं जातं.

काही दिवसांआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपृष्ठ “द ऑर्गनायझर”मधून राष्ट्रवादी अजित पवार (Ajit pawar) यांच्याबाबत विधान केलं होतं.”अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची ब्रॅंड व्हॅल्यू कमी केली” या वक्तव्यावरुन अजित पवारांना महायुतीत डावललं जात असल्याचं दिसलं. त्यावर अजित पवारांनी आपली भुमिका स्पष्ट करत म्हणाले की, “प्रत्येकाला आपली भुमिका मांडण्याचा आणि आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे.” त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी केलेल्या काही वक्तव्यावरुन देखील अजित पवार गटात नाराजी आणि त्याचबरोबर महायुतीत मतमतांतर दिसून आलं. छगन भुजबळांनी जागा वाटपासंदर्भात भाष्य केलं मात्र त्यावर राष्ट्रवादी आणि महायुतीत संभ्रम नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आणि त्यानंतर अजित पवार (Ajit pawar) चक्क नोट रिचेबल झाल्याचं दिसलं.

शरद पवारांची साथ सोडून अजित पवार (Ajit pawar) महायुतीत सामील झाले खरे पण त्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही आहे. आधीच लोकसभेत कमी जागा मिळाल्या. एका जागेवर यश मिळाल्यानंतर अजित पवारांच्या गटात नाराजी सुरु होतीच त्यातच आता विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात महायुतीत खडाजंगी सुरु आहे. काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेत असले की अजित पवार (Ajit pawar) हे असक्रिय असल्याचं दिसतं. लोकसभेच्या प्रचारावेळी देखील ते शिंदे-फडणवीस यांच्यासोबत “दादा” दिसून आले नाहीत.स्वत:पंतप्रधान मुंबई मध्ये येऊन सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वागतासाठी उपस्थित नव्हते. त्यामुळे महायुतीत अजित पवार असुरक्षित किंवा त्यांना डावललं जात असल्याचं चित्र दिसतयं.

अशातच दादा गटातील अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याने परतीच्या वाटेवर असल्याने दादा गटाला गळती लागते की काय अशी चर्चा सुरु झाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून मंत्री छगन भुजबळ आणि खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री धनंजय मुंडे हे प्रामुख्याने पक्षाची भुमिका मांडत आहेत. पण पक्षाचे प्रमुख असलेले अजित पवार कुठेतरी गायब असल्याचं दिसत आहे. विधानसभा निवडणुक काही महिन्यांवर असताना आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस वाढत आहे. २२ जून रोजी सरकारचं शिष्टमंडळ जालना येथे जाऊन ओबीसी आंदोलकांची भेट घेतली. तर आज (२३ जून)रोजी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली यात देखील,”अजित दादा गटातील काही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको”अशी भुमिका भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी घेतली. या संपूर्ण अपयशानंतर अजित पवार हे नेमकी कोणती खेळी खेळतील..किंवा काकांची साथ पुन्हा देणार का ? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

हे ही वाचा

सुदृढ नागरिक ही राज्याची संपत्ती, म्हणून…INTERNATIONAL YOGA दिनी CM Shinde यांचे आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss