राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलू न दिल्यामुळे अजित पवार नाराज

अजित पवार पुन्हा पक्षावर नाराज आहेत का ?

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलू न दिल्यामुळे अजित पवार नाराज

दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान अजित पवार हे दोनवेळा व्यासपीठ सोडून निघून गेले होते. त्यांच्या या तडकाफडकी स्वभावामुळे ते पुन्हा पक्षावर नाराज आहेत का ? अशी चर्चा सुरु आहे. अधिवेशनादरम्यान त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले नसल्याने ही चर्चा सुरु झाली आहे. याबाबत त्यांनी समोर येऊन स्पष्टीकरणही दिलं आहे.

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षातील सर्व मोठ्या नेत्यांची भाषणे झाली. मात्र यात अजित पवार यांचा समावेश नव्हता. या अधिवेशनात शरद पवार यांच्या भाषण आधी जयंत पाटील भाषण करतील अशी घोषणा झाली. त्यावेळी अजित पवार यांना बोलायला द्या, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी केल्या. कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरु असताना अजित पवार तिथून निघून गेले.

जयंत पाटील यांचे भाषण झाल्यानंतर अजित पवार यांचे नाव पुकारण्यात आले. मात्र त्यावेळी अजित पवार हे सभागृहात उपस्थित नव्हते. अजित पवार सभागृहात नसल्याने त्यांना घेऊन जाण्यासाठी सुप्रिया सुळे बाहेर गेल्या. त्या अजित पवार यांना सभागृहात परत घेऊन आल्या. मात्र तोपर्यंत शरद पवार यांचे समारोपाच्या भाषणाला सुरुवात झाली होती. यामुळे त्यांना या कार्यकारत भाषण करता आलं नाही.

हे ही वाचा:

गणपती विसर्जनाच्या पद्धतीवरुन सुषमा अंधारेंकडून नवनीत राणांचा खरपूस समाचार

या’ दिवशी होणार रामदास कदम यांच्या बालेकिल्यात आदित्य ठाकरेंची सभा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version