Ajit Pawar, नव्या उपमुख्यमंत्र्यांचा ४१ वर्षांचा राजकीय प्रवास घ्या जाणून, ५ वेळा उपमुख्यमंत्री…

अजित पवार नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ या काळात जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री होते. १९९१ सालपासून अजित पवार विधानसभा सदस्य आहेत.

Ajit Pawar, नव्या उपमुख्यमंत्र्यांचा ४१ वर्षांचा राजकीय प्रवास घ्या जाणून, ५ वेळा उपमुख्यमंत्री…

आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले असून अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळाला. अजित पवारांनी ५ वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर चला जाणून घेऊयात नवीन उपमुख्यमंत्र्यांच्या ४१ वर्षाचा राजकीय प्रवास.

अजित पवारांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अजित पवारांचं नाव येतं. राजकारणात अजित पवार यांना ‘दादा’ म्हणून ओळखलं जातं. खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेते असा अजित पवार यांचा राजकीय प्रवास आहे. इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून अजित पवारांनी कामगिरी बजावली. १९९१ साली पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांची निवड झाली. अजित पवार १९९१ साली बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले. या काळात ते कृषी, फलोत्पादन आणि उर्जा या खात्याचे राज्यमंत्री होते. १९९१ ते १९९५ या काळात ते विधानसभा सदस्य होते.

अजित पवार नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ या काळात जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री होते. १९९१ सालपासून अजित पवार विधानसभा सदस्य आहेत. १९९९ ते २००४ या काळात ते पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे आणि फलोत्पादन या खात्याचे राज्यमंत्री होते. १९९५ पासून २०१९ पर्यंत सलग ७ वेळा अजित पवार बारामती विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. २०१९ साली १ लाख ६५ हजारांपेक्षा जास्त मतांनी अजित पवार निवडून आले. २०१० पर्यंत ते जलसंपदा खात्याचे मंत्री होते. अजित पवारांवर २०१४ साली सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले.२०१९ साली अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलली शपथ अनेकांसाठी धक्का होता. अजित पवारांनी आतापर्यंत शिक्षण, सहकार, क्रीडा, कृषी अशा अनेक विभागांमध्ये आपली भूमिका पार पाडली आहे. मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते अशी पदं अजित पवारांनी भूषवली आहेत.

हे ही वाचा:

राज्यात आज घडलेली घटना लोकशाही आणि राज्यघटनेकरिता दुर्दैवी, बाळासाहेब थोरात

अजित पवारांच्या बंडखोरीवर थोरल्या पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version