Tuesday, September 24, 2024

Latest Posts

निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यावर अजित पवारांनी केले वक्तव्य म्हणाले, बारामती कुणी गेले की ब्रेकिंग न्यूज…

गेल्या आठ ते दहा वर्षांत भारतीय जनता पक्ष अनेक निवडणुकांमध्ये यशस्वी ठरताना दिसतो. गावपातळीपर्यंत पक्षबांधणी, त्याला समविचारी संघटनांची जोड तसेच कल्याणकारी योजनांचा तळागाळापर्यंत प्रसार व प्रचार अशी अनेक कारणे यामागे आहेत. आताही आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद कमकुवत असलेल्या देशभरातील १४४ तर राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांवर या मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा : 

माजी हॉकीपटू दिलीप तिर्की सांभाळणार हॉकी इंडियाचा नव्या अध्यक्षाचा पदभार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेला पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २२ सप्टेंपासून तीन दिवस या मतदारसंघात आहेत. या मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. याअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांत २१ कार्यक्रम होणार आहेत.

निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपले मत मांडले त्यांनी म्हटले, “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या बारामतीत आल्या होत्या. यावेळी चारशेच्या वर लोकसभेचा आकडा जावा, यासाठी भाजप प्रयत्न करते. तो त्यांचा अधिकार आहे. आघाडीच्या जास्तीत-जास्त जागा निवडून याव्यात म्हणून आमचा प्रयत्न आहे. बारामतीला कुणी गेले की, ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज.”

‘फक्त परवानगीच मिळाली ना? मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमलं’, कोर्टाच्या निकालानंतर राणेंची बोचरी टीका

पुढे पवार यांनी म्हटले सितारामन त्यांच्याबद्दल मी चांगले मत मांडतो. त्यांचा आदर करतो. राज्यात मी अर्थमंत्री असताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मला जेएससी कौन्सिलचे अध्यक्षपद दिलं होतं. तेव्हा आम्ही अर्थमंत्री म्हणून एकमेकांशी बोलायचो. प्रश्न सोडवायचो, असं अजित पवार यांनी सांगितलं.

कोणताही प्रकल्प मंजूर करण्यासाठी दिल्लीला जायचं असतं. त्यासाठी संसदेत काम करणाऱ्या सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, फौजिया खान, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे सक्षम आहेत. त्यात मी लक्ष घालण्याचं कारण नाही. मी राज्यातील प्रश्नांवर लक्ष घालतो.

Uddhav thackeray live : विजय नेहमी सत्याचाच होतो

Latest Posts

Don't Miss