कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवडीबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवडीबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड झाल्याबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत अभिनंदन केले. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले त्याबद्दल अजित पवार यांनी अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन राज्यातील विविध प्रश्नासंबंधी दिलेल्या पत्रातील विषयाची माहिती दिली.

हेही वाचा : 

ठाकरे गटाचा मोर्चा अडवल्याने, नवी मुंबई पोलीस आणि खा. राजन विचारे यांच्यात बाचाबाची

शिवसेना आमदार भास्करराव जाधव यांच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता भास्करराव जाधव यांच्याशी बोललो आहे. हल्ला झाला त्यावेळी ते चिपळूणला घरी नव्हते मुंबईत आहेत मात्र त्यांची मुलं घरी होती. दगडफेक केली गेली आहे हे सत्य आहे. एखाद्याला संरक्षण देणे व अचानक काढून घेणे योग्य नाही. सर्वांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. कायदा व सुव्यवस्था नीट ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. भास्करराव जाधव यांच्या घरी झालेल्या दगडफेकीसंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

लातूरमधील १६ उद्योजकांना डावलून रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांना अवघ्या दहा दिवसांत भुखंड मंजूर; भाजपाचा आरोप

Exit mobile version