अजित पवारांचा पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल

अजित पवारांचा पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल

ajit pawar

सध्या महारष्ट्रामधलं (Maharashtra) राजकारण चांगलंच तापलं आहे. आज राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद परिषद घेऊन पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लेखिका अनघा लेले यांना फॅक्चर्ड फ्रिडम (Factured Freedom) या अनुवादित पुस्तकासाठी देण्यात आलेला पुरस्कार राज्य सरकारने रद्द केला आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. पुरस्कार रद्द करून अघोषित आणीबाणी (Emergency) लादण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. हे सरकार साहित्य आणि संस्कृती (Literature and Culture) क्षेत्राला नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याने आम्ही त्याचा निषेध करतो, अशा शब्दात अजित पवार यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे.

अजित पवार म्हणाले की, राज्यात सरकार सत्तेत आल्यापासून दररोज नवनवीन वाद काढण्यात येत आहे. त्यामुळे महत्त्वाच्या प्रश्नांबाबतच लक्ष दुसरीकडे विचलित केलं जातं. बेरोजगारी आणि महागाई (unemployment and inflation) तसेच शेतकरी समस्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र आता सध्याच्या शिंदे फडणवीस (Shinde Fadnavis) सरकारने कहर करत साहित्य क्षेत्रातही सरकारने हस्तक्षेप केला आहे. पुढे ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी महाराष्ट्र निर्मितीपासून साहित्य, कला, संस्कृतीला नेहमी मानसन्मान दिला. तिच परंपरा पुढे चालवली गेली. आता ६ डिसेंबर २०२२ रोजी उत्कृष्टी साहित्य निर्मितीसाठीचे पुरस्कार जाहीर केले. एकूण ३३ पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी अनुवादित साहित्यासाठी अनघा लेले यांना ६ डिसेंबर रोजी पुरस्कार जाहीर केला होता. मात्र सहा दिवसांत अचानक सरकारने पुरस्कार समिती बरखास्त करून अनघा लेले यांचा पुरस्कार रद्द केला. सरकारने यात हस्तक्षेप करणं निषेधार्ह आहे.

पुरस्कार रद्द करणे आणि त्यात हस्तक्षेप करणे गैर आहे. साहित्य क्षेत्रातील सरकारचा हस्तक्षेप निषेधार्ह आहे. राजकीय नेत्यांनी साहित्य क्षेत्रात ढवळाढवळ करू नये. नवं सरकार आल्यापासून वाद निर्माण होत आहे. लक्ष हटवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. पुरस्कार रद्द करून राज्य सरकारने अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो, असं पवार म्हणाले. या पुस्तकाच्या माध्यमातून नक्षली चळवळीला प्रोत्साहन मिळेल असं सांगितलं जात आहे. याकडे अजित पवार यांचं लक्ष वेधलं असता त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

हे ही वाचा : 

RBI माजी गव्हर्नर रघुराम राजन राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी

जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आर्थिक अडचणीत असताना, ‘या’ उद्द्योगपतीने मदतीचा केलेला हात पुढे

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version