अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांचे केले कौतुक

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये (Maharashtra Politics) पुन्हा एकदा शक्तीशाली राजकीय भूकंप झाला आहे.

अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांचे केले कौतुक

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये (Maharashtra Politics) पुन्हा एकदा शक्तीशाली राजकीय भूकंप झाला आहे. मागीलवेळी भाजपकडून टार्गेट उद्धव ठाकरे यांची शिवसेना होती, तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस राहिली. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला अखेर राष्ट्रवादी फोडण्यात यश आलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ३० आमदारांसह भाजपशी हातमिळवणी केली असून त्यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीकडून ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये राष्ट्रवादी स्थापनेपासून शरद पवारांचे जे विश्वासार्ह शिलेदार समजले जातात त्याच चेहऱ्याचा समावेश असल्याने राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. यामध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले छगन भुजबळ, कोल्हापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पेटल यासारखे मातब्बर चेहरे अजित पवारांसोबत गेल्याने राष्ट्रवादीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अजित पवार आणि त्यांच्या अन्य साथीदारांसह आम्ही निर्णय निर्णय घेऊन शिंदे फडणवीस सरकारमध्ये आम्ही जाण्याचा निर्णय घेतला. आणि मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आहोत. तसेच आज आम्ही राजभवनात जाऊन राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही शपथविधी घेतला. मंत्रिमंडळाच्या संदर्भात अजित पवार म्हणाले, मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी देण्याचा प्रयत्न आमच्याकडून देण्यात येईल. तसेच राजकारणात बघायला गेलं तर विरोधी पक्ष नेते म्हणू अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा दिला आणि आणि त्यानंतर आज त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला. राज्याचा विकास बघता आमच्या सर्वांच्या मते, राज्याच्या विकासाला चालना मिळायला हावी पाहिजे यासाठी आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही देखील पाठिंबा देत आहोत. विरोधी पक्ष नेते म्हणून बसल्यावर त्यातून आउटपुट काही निघत नाही त्यामुळे तेवढा विकास करता येत नाही. आणि म्हणूनच मी आणि माझ्या सोबतचे सहकारी त्यांच्यासोबत जाऊन जनतेच्या विकासाची कामे करण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र मोदी हे देशाला पुढे नेण्याचा आणि मजबूत बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच आम्ही तरुणांना देखील संधी देणार असल्याचा प्रयत्न आमच्या कडून करणार आहोत.

अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना असे देखील सांगितले की, उद्याच्या काळात निवडणूक लढवण्याची वेळ आली तरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहोत. तसेच आम्ही घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढाऊ असे देखील सांगितले. तसेच आम्ही जर शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर मग आम्ही भाजप सोबत देखील जाऊ शकतो असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. कारण या आधी आम्ही ३ पक्ष एकत्र होतो त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना असे आम्ही एकत्र मिळून काम करत होतो. तसेच पक्ष वाढीसाठी आम्ही नव्या चेहऱ्यानं देखील संधी देऊ असे देखील अजित पवार म्हणाले. लोकप्रतिनिधींसोबत संपर्क साधून त्यांच्याशी देखील या संदर्भात चर्चा केली.

हे ही वाचा:

अजित पवारांच्या शपथविधीनंतर राज ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, दिगू टिपणीस’ झाला…

नवे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर म्हणाले मुख्यमंत्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version