Ajit Pawar : व्हिडीओत विनयभंग झाल्याचे दिसत नाही ; अजित पवार

Ajit Pawar : व्हिडीओत विनयभंग झाल्याचे दिसत नाही ; अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने केली. आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार देणाऱ्या पीडित महिलेने आज मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत आव्हाडांनी जाणूनबुजून ते कृत्य केले असल्याचा आरोप केला. परंतु यावर राष्ट्रवादीचे बडे नेत्यांनी आक्रमक पवित्रा उचला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची राहत्या निवास्थानी भेट घेतली. त्यावेळी पवार म्हणाले, आपण संविधानाला मानणारे आपण आहोत. अलीकडच्या काळात काही जण गळा घोटण्याचा प्रकार करत आहेत. आपल्याकडून असे काम होणार नाही, लोकशाहीला धब्बा लागणार नाही याची काळजी घ्यावी, अशा शब्दात विधानसभेचे माजी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली.

जितेंद्र आव्हाड हे अनेकांना हाताने बाजूला करत होते. त्याचप्रमाणे त्यांनी या महिलेला बाजुला केले. बाकी काही घडलेले नाही. मुख्यमंत्र्यांची कार काही फूट अंतरावरच होती. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढं येऊन विनयभंगाचा प्रकार घडला नसल्याचे सांगायला पाहिजे. तुम्ही कशाही प्रकारे मुख्यमंत्री झाला असलात तरी तुम्ही महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहात, असेही पवार यांनी म्हटले.

हेही वाचा : 

‘राष्ट्रवादी नेत्यांकडे नैतिकता असेल, तर आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा स्वीकारला पाहिजे’ ; चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरू असल्याची टीका पवार यांनी केली. आव्हाडांवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणे हा भ्याडपणा असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष देण्याची गरज आहे. कोणतेही कारण नसताना जर लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचे, अपमानित करण्याचे काम होत असेल तर जनतेने याची दखल घ्यायला हवी असे आवाहनही पवार यांनी केले. जितेंद्र आव्हाडांवरील हा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणीदेखील त्यांनी केली.

‘महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरू, आव्हाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी’ ; अजित पवार

राज्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारीचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याला बगल देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अशा घटना समोर आणल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले. विवियाना मॉल प्रकरणातील प्रेक्षकाने आव्हाड यांनी मारहाण केली नसल्याचे सांगितले. तरीदेखील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आला नाही. दिवस बदलतात. चार दिवस सासूचे असतात, तसे चार दिवस सुनेचे असतात असे सांगताना अजित पवार यांनी नियमांचे, कायद्याचे पालन होत नसेल तर कोणत्याही पक्षाचा आमदार का असेना कारवाई झाली पाहिजे असेही त्यांनी म्हटले.

Gold Rate : सोन्याला पुन्हा एकदा झळाळी, चोवीस तासातदरात १५०० रुपयांची वाढ

Exit mobile version